टायर फुटल्याने स्कॉर्पिओ उलटली

0

गाडीचे नुकसान; चालक किरकोळ जखमी

 

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा टायर फुटल्याने उलटली. त्यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर गाडीमध्ये फक्त चालकच असल्याने तो किरकोळ स्वरूपात जखमी झाला. हा अपघात शुक्रवार दि. 5 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील वांगदरी येथे झाला.

 
तालुक्यातील वांगदरी येथे नवदाम्पत्याला सोडून स्कॉर्पिओ (क्र. एमएच 16, बीएच 2694) मढेवडगावच्या दिशेने भरधाव वेगात चालली होती. गाडी वांगदरी शिवारातील नागडेवाडी येथे आली असता अचानक गाडीचा टायर फुटला. यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या बाजुला जावून उलटली झाली. सुदैवाने गाडीमध्ये फक्त चालक असल्याने तो किरकोळ स्वरूपात जखमी झाला. या अपघातात बंडू वाबळे हा किरकोळ जखमी झाला आहे.

LEAVE A REPLY

*