टायर्स दुकान फोडणारी टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत 6 सराईत गुन्हेगारांसह 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील घोटी, सिन्नर, लासलगाव, सायखेडा व सटाणा परिसरातील टायर्स दुकाने रात्रीचे वेळी फोडून दुकानातील टायर्स चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. याबाबत घरफोडीचे गुन्हे दाखल होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या पथकाने या गुन्ह्यांचे समांतर तपासात धुळे, मालेगाव, नाशिक शहर परिसरातून एकूण 06 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. त्यांचेकडून नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील एकूण 5 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. आरोपी व माल विकत घेणारे आरोपी यांचे ताब्यातून ट्रक, ट्रॅक्टर, आयशर, कार, दुचाकीचे एकूण 244 टायर्स, 07 बॅटर्‍या असा एकूण 9 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तर अशरफ हमीद शेख (वय 35, रा. पवारमळा, टाकळी रोड, नाशिक) फय्याज अल्लाउद्दीन अन्सारी (वय 22, रा. कनॉल रोड, जेलरोड नाशिक) साजिद अन्वर पठाण (वय 19, रा. कनॉॅल रोड, जेलरोड नाशिक), गफार मुख्तार सय्यद (वय 19, रा. कनॉल रोड, जेलरोड नाशिक), जावेद अहेमद मोहम्मद अन्सारी (वय 36, रा. लालनगर, मालेगाव), अजीज मुख्तार मलिक (वय 42, रा. गरीब नवाज नगर, धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले असून खुर्शीद हमीद शेख (रा. पडघा, जि. ठाणे) व राजकुमार (पूर्ण नाव माहित नाही) हे दोघे फरार आहेत.

आरोपींपैकी अशरफ हमीद शेख व खुर्शीद हमीद शेख हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर नाशिक शहर व ग्रामीण जिल्ह्यात घरफोडी, जबरी चोरी, चोरीचे गुन्हे दाखल आहे. सदर गुन्ह्याचे तपासात आरोपींनी कबुली वरून नाशिक ग्रामीण, नाशिक शहर, ठाणे ग्रामीण, पुणे ग्रामीण जिल्यातील टायर्स चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहे.

यामध्ये लासलगाव पो. स्टेशन गु. र. न. 18/2017 भादंवि 454, 457, 380, घोटी पो. स्ट.े गु. र. नं., 13/2017 भादंवि 454, 457, 380, सायखेडा पो. स्टे. गु. र. न. 13/2017 भादंवि 457, 380, सिन्नर पो. स्टे. गु. र. नं., 33/2017 भादंवि 457, 380, सटाणा पो. स्टे. गु. र. नं., 38/2017 भादंवि 461,380 याप्रमाणे गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यात आहे.

LEAVE A REPLY

*