टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचे लाँग ड्रायव्हवरचे फोटो व्हायरल!

0

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी दोघांना अनेक सार्वजनिक ठिकाणी आणि पार्ट्यांमध्ये एकमेकांबरोबर पाहण्यात आले आहे.

नुकतेच त्यांचे लाँग ड्रायव्हवरचे फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोंमध्ये दिशा गाडी चालवताना दिसतेय तर टायगर श्रॉफ तिच्या बाजूच्या सीटवर बसलेला दिसतो आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिशा ‘रोमियो अकबर वाल्टर’मध्ये झळकणार आहे. याचित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूत दिसणार आहे.

एवढेच नाही तर दिशा करण जोहरच्या स्टूडेंट ऑफ द इअर 2 मध्ये सुद्धा दिसू शकते.

नुकतीच दिशा कुंग फू योगा मध्ये दिसली होती. तर दुसरीकडे टायगर श्रॉफ मुन्ना माइकलमध्ये दिसणार आहे. नुकतेच त्याचे रेम्बो चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

 याआधी ही अनेक वेळा टायगर आणि दिशाला लाँग ड्रायव्हर गेलेले असताना स्पॉट करण्यात आले होते. मात्र त्यावेळीसुद्धा त्यांनी ही गोष्ट स्वीकारली नव्हती.

LEAVE A REPLY

*