‘टायगर जिंदा है’ चित्रपटातील फोटोज व्हायरल!

0

सध्या सलमान मोरक्को येथे ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी गेला आहे. याचदरम्यान सेटवरील काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये सलमानच्या गळ्यात त्याचा लकी अफगाणी स्कार्फ दिसत आहे. यावरून हे स्पष्ट होते की, सलमान पुन्हा एकदा या चित्रपटात त्याच्या जुन्या टायगरच्या लूकमध्ये दिसणार. सलमानचे हे फोटोज् दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी पोस्ट केले आहे.

या चित्रपटातही सलमानसोबत कॅटरिना कैफ रोमान्स करताना दिसणार आहे.

‘टायगर जिंदा है’ या चित्रपटानंतर सलमान रेमो डिसूजाच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

हा चित्रपट पूर्णत: डान्सवर आधारित असून, सलमान यामध्ये एका वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहे; मात्र याबाबतची अद्यापपर्यंत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

*