टाटा समूह १० वर्षे तोट्यातील एअर इंडियाला विकत घेणार?

0

टाटा समूह एअर इंडियाला विकत घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

१० वर्षे तोट्यात असलेली ‘एअर इंडिया’ ही राष्ट्रीय विमान कंपनी विकत घेण्यात टाटा उद्योग समूहाने स्वारस्य दाखविले असल्याचे वृत्त आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनेने हे वृत्त देताना म्हटले की, सिंगापूर एअरलाइन्सच्या भागीदारीत एअर इंडियाचे ५१ टक्के भागभांडवल खरेदी करून ही विमान कंपनी ताब्यात घेण्याच्या इराद्याने टाटा समूहाने हालचाली सुरू केल्या आहेत. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सरकारी पातळीवर प्राथमिक स्वरूपाची बोलणीही केली आहेत.

LEAVE A REPLY

*