टँकरच्या धडकेने दोन जण जागीच ठार

0
नंदुरबार / विसरवाडी- खांडबारा रस्त्यावर टँकर चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून मोटरसायकलला धडक दिल्याने त्यावरील दोनस्वारांचा जागीच मृत्यू झाला.
मोतीराम बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाहन (क्र.एम.एच.45-0147) वरील वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून समोर जाणार्‍या मोटरसायकल (क्र.एम.एच19- यु.7165) ला जोरदार धडक दिल्याने त्यावरील स्वार राजू जालमसिंग वळवी (22) व मालसिंग चंद्रसिंग गावीत (26) रा.बिजगांव (ता.नवापूर) या दोघांचा जागीच मृत्यू झाला व मोटरसायकलचेही नुकसान झाले.

याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरूणांचा मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*