झू झू ‘ट्यूबलाइट’च्या प्रमोशनसाठी भारतात येणार!

0

सलमान खानच्या  ‘ट्यूबलाइट’ चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे.

या चित्रपटाचे ट्रेलर आणि पहिले गाणे रिलीज करण्यात आले असून, त्यामधील सलमानचा अंदाज प्रेक्षकांना खूपच भावला आहे.

कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ईदला रिलीज होणार असून, भारत-चीन युद्धावर चित्रपट आधारित आहे.

चित्रपटात चिनी अभिनेत्री झू झू ही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत असून, प्रमोशनसाठी ती भारतात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.
याविषयी बोलताना कबीर खानने म्हटले की, या चित्रपटात झू झूची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ज्याविषयी आम्ही अद्यापपर्यंत फारसे बोललो नाही. मात्र आता झू झू प्रमोशनसाठी भारतात येणार असल्याने तिच्या भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. परंतु तिच्या येण्यासाठी आम्ही अद्यापपर्यंत फारसा प्लॅन केला नसल्याचेही कबीरने स्पष्ट केले.

कबीर खानसोबत सलमानचा हा तिसरा चित्रपट आहे.

LEAVE A REPLY

*