ज्येष्ठ नागरीक कौटुंबिक अत्याचार जागृती मेळावा

0
शहादा । ता.प्र.-ज्येष्ठ नागरीक छळ प्रतिबंध जागृती दिवसाचे औचित्य साधून दि. 15 जून रोजी ज्येष्ठ नागरीक कौटुंबिक अत्याचार जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम महाराष्ट्र ज्येष्ठ नागरीक महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य व्ही.के. भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि डी.एच. पाटील, अ‍ॅड.जी.व्ही. पाटील, शंभू सदाशिव पाटील यांच्या पुढाकाराने वसंतराव नाईक शैक्षणिक संकुलच्या सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बारकू नवल पाटील यांनी दिली.

नंदुरबार येथील आई-वडील व ज्येष्ठ नागरीक कल्याण संस्थेच्या वतीने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वृद्ध व्यक्तींचे हक्क, त्यांच्या समस्या व त्यांच्यावरील अत्याचाराविषयी जागृती निर्माण होणे व त्यांना निरोगी, सुदृढ व आनंददायी आयुष्य जगण्यासाठी पुरक वातावरण निर्माण करणे हा कार्यक्रमाचा उद्देश असून विशेष प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, उपविभागीय दंडाधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, शहाद्याचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी मनोजकुमार खैरनार, पोलीस उपविभागीय अधिकारी महारू पाटील, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राकेश महाजन, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बारकू पाटील, सुभाष पाटील, अरविंद नांद्रे, युवराज पाटील, जगन कोकणी, महेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, वसंत मडळ, सौ.आशा गवळी, बबन पाटील यांनी केले आहे. मिरझा आफीक बेग वाहेद बेग आणि इम्रानखान मोहंमद खान यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*