ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

0

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईत लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

किडनीच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या उपचार सुरू आहेत.

लीलावती रुग्णालयातील एका डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सध्या त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या सुरु असून त्यानुसार पुढील उपचार करण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*