जैन सोशल फेडरेशनचे कार्य कौतुकास्पद; हस्तीमल मुनोत यांचे प्रतिपादन

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रबुद्ध विचारक पु. आदर्शऋषिजी म.सा. यांच्या मार्गदर्शनाखाली जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्ते करत असलेल्या सेवाभावी कार्याचे कौतुक करून हे कार्य यापुढेही असेच सुरू ठेवावे, असे आवाहन  समाजभूषण, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी केले व हॉस्पिटलच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. आचार्य आनंदऋषिजी म.सा. यांच्या 117 व्या जन्मदिनानिमित्त आनंदऋषिजी हॉस्पिटल येथे स्व.जतनबाई बोथरा यांच्या स्मरणार्थ माणकचंद बोथरा (पारस उद्योग समुह) परिवाराच्यावतीने प्रायोजित मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन  समाजभुषण, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रबुद्ध विचारक पु. आदर्शऋषिजी म.सा. यांच्या मार्गदर्शनाखाली जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्ते करत असलेल्या सेवाभावी कार्याचे कौतुक करून हे कार्य यापुढेही असेच सुरू ठेवावे, असे आवाहन  समाजभूषण, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी केले व हॉस्पिटलच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. आचार्य आनंदऋषिजी म.सा. यांच्या 117 व्या जन्मदिनानिमित्त आनंदऋषिजी हॉस्पिटल येथे स्व.जतनबाई बोथरा यांच्या स्मरणार्थ माणकचंद बोथरा (पारस उद्योग समुह) परिवाराच्यावतीने प्रायोजित मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन  समाजभुषण, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुनोत म्हणाले की, आनंदऋषिजी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत मशिनरी व उपचार  उपलब्ध असल्याने मोफत शिबिराचा फायदा सर्व सामान्य रुग्णांना होत आहे. हॉस्पिटलने आरोग्य सेवेबरोबरच ब्लड बँक, नर्सिंग कॉलेज, रुग्णांच्या नातेवाईकांची निवास व भोजन व्यवस्था याही बाबी सुरू केलेल्या असून, ही बाब निश्चितच अभिनंदनीय अशी आहे. आज यामुळेच संपूर्ण भारतातून या हॉस्पिटलमध्येे रुग्ण सेवा घेत आहेत. यावेळी मर्चंट बँकेचे अध्यक्ष संजीव गांधी, उपाध्यक्ष विजय कोथिंबीरे,  पारस उद्योग समूहाचे पेमराज बोथरा, संतोष बोथरा, सतीश बोथरा, मनिषा बोथरा, संचालक सर्वश्री आनंदराम मुनोत, सीए. मोहन बरमेचा, श्रीमती मीनाताई मुनोत, अनिल पोखरणा, संजय बोरा, सुभाष भांड, सुभाष बायड, कमलेश भंडारी व दंतरोग तज्ज्ञ डॉ.पूजा काकडे आदी उपस्थित होते. मर्चंट बँकेचे अध्यक्ष संजीव गांधी, संतोष बोथरा यांनी मनोगत व्यक्त केले.  डॉ. पूजा काकडे-पवार यांनी शिबिरातील उपस्थितांची तपासणी करून सविस्तर मार्गदर्शन केले. या शिबिरात 267  रुग्णांनी लाभ घेतला. प्रकाश छल्लानी यांनी आभार मानले. यावेळी जैन सोशल फेडरेशनचे सर्व सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*