जैन ओसवाल युवक संघातर्फे आयोजित सायकल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

0

शांतीकुमारजी फिरोदिया फौंडेशनचे सहकार्य

अहमदनगर (प्रतिनिधी) – श्री. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन सहकार्याने जैन ओसवाल युवक संघ(जॉईज ) स्नेह उत्सव 2017 आयोजित सायक्लोथाँन ( सायकल ) स्पर्धेचे उद्घाटन केशरगुलाब मंगल कार्यालय येथे अर्बन बँकेचे संचालक दीपक गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मर्चंट बँकेचे संचालक आमित मुथा, अजित कटारिया,अध्यक्ष सचिन डुंगरवाल , सर्व सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
लहानांपासून ते मोठ्या पर्यंत सर्वांना आरोग्यासाठी सायकल चालविणे अत्यंत फायदेशीर असून पर्यावरण संवर्धन व सामजिक बांधिलकी जोपासण्यासाठी व सर्वांना एकत्र आणण्यासाठी हा उपक्रम जॉईज तर्फे राबविण्यात आला. मुले ,मुली, महिला पुरुष, वयोवृद्ध आसे सर्वजण या आनंददायी सायकल स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
या सायकल स्पर्धेत स्पर्धेपेक्षा सांघिकतेला महत्व देण्यात आले. उत्तम सायकल चालवून दुसर्‍याला त्रास होणार नाही याची काळजी घेत सायकलींगचा आनंद घेणार्‍या सर्व स्पर्धकांना मेडल देण्यात आले. सायकल व आरोग्य विषयी जनजागृतीसाठी आयोजित या स्पर्धेत सर्व वयोगटातील सहाशेच्यावर सायकल पटु सहभागी झाले होते. स्पर्धा यशस्वी ते साठी सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*