…जेव्हा शाहरुख अहमदाबादच्या ‘सेजल’ला भेटतो!

0

‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

ज्यामध्ये सर्वाधिक सेजल नावाच्या मुली असणाऱ्या शहराला किंग खानने भेट देण्याचं ठरवलं होतं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या या आवाहनाला जवळपास 7000 सेजल नावाच्या मुलींनी प्रतिसाद दिला आणि त्यानंतर शाहरुखने थेट अहमदाबाद गाठलं.

नुकतेच शाहरुखने आणि इम्तियाझ अलीने अहमदाबादमध्ये चाहत्यांची भेट घेत या चित्रपटातील राधा हे गाणं लाँच केलं.

या अहमदाबाद दौऱ्यामध्ये शाहरुखने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

शाहरुखने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन या खास भेटीचा आनंद व्यक्त करत एक फोटोही पोस्ट केला आहे. मुख्यमंत्री विजय रुपानी यांची भेट घेताना इम्तियाज अलीसुद्धा शाहरुखसोबत उपस्थित होता.

LEAVE A REPLY

*