‘जेंटलमॅन’साठी सिद्धार्थ बनला रॅपर

0

ए जेंटलमॅन’मध्ये सिद्धार्थ आणि जॅकलिन फर्नांडिसची जोडी दिसणार आहे.

सिद्धार्थ मल्होत्राने ए जेंटलमॅनमध्ये ‘बंदूक मेरी लैला’ या गाण्यातून बॉलिवूडमध्ये रॅपर म्हणून पदार्पण केले आहे. हे गाण सिद्धार्थ आणि रफ्तारने मिळून गायले आहे. या गाण्याला सचिन-जिगर यांच्या जोडीने संगीत दिले आहे.

या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांनी आधीचे डोक्यावर घेतली आहेत. या आधी रिलीज झालेली गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसली आहेत.

यात सिद्धार्थ डबल रोलमध्ये दिसणार आहे. गौरव आणि ऋषी नावाच्या तरुणाची भूमिका तो साकारतो आहे. तर जॅकलिन काव्या नावाच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. अ‍ॅक्शन व कॉमेडीची भरमार असलेला राज निदिमोरू आणि कृष्णा डीके दिग्दर्शित हा चित्रपट ऑगस्टअखेरिस रिलीज होणार आहे.

जॅकलिन आणि सिद्धार्थशिवाय यात सुनील शेट्टीची ही महत्त्वाची भूमिका आहे. मायामीला या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*