Type to search

धुळे

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षकांचा मोर्चा

Share

धुळे | जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी आज शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर समन्वय समितीतर्फे  मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो शिक्षक सहभागी झाले होते.

जुनी पेन्शन योजना लागु करावी, सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दुर करावी, कंत्राटी धोरण बंद करून रिक्तपदे तत्काळ भरावी, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावे, अनुकंपाभरती तत्काळ करावी, केंद्राप्रमाणे महिला कर्मचार्‍यांना प्रसुती, बाल संगोपण रजा व अन्य सवलती लागू कराव्यात. सर्व कर्मचार्‍यांच्या अर्जीत रजा साठविण्याची कमाल मर्यादा वाढविण्यात यावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येवू नये, यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात दिनेश महाले, किशोर पगारे, वनराज पाटील, देवेंद्र पाटील, रंजना साळुंखे, धनराज पाटील, भानुदास पाटील यांच्यासह शेकडो शिक्षक सहभागी झाले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!