जीवावर उठलेले रस्ते

0

सव्वा वर्षात 302 अपघाती बळी :  एस.पी. शर्मा यांची उपाय योजना

सागर शिंदे @ अहमदनगर

नगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने विस्तृत आहे. यामुळे क्राईम रेटमध्ये पहिल्या स्थानावर आहे. क्राईमरेट पाठोपाठ रस्ता अपघातात सुद्धा नगर जिल्हा आघाडीवर आहे. गेल्या 16 महिन्यांत शहरासह तालुक्यात 302 जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. चारशेहून अधिक जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलीसांच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. वाढलेल्या अपघाताला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पुढाकार घेतला आहे. शर्मा यांच्या प्रयत्नामुळे अनेकांना जीवदान मिळणार आहे.
पोलीस अधीक्षक शर्मा यांनी शहरातील वाहतुकीचा निरिक्षण केला आहे. त्यात अपघातात बळी गेलेल्याची संख्या मोठी असल्याचे समोर आले. यामुळे शर्मा यांनी नगर शहरात सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत अवजड व हलक्या मालवाहतुक करण्यार्‍या वाहनांना बंदी घातली आहे. रात्री 10 नंतर या वाहनांना

शहरात प्रवेश देण्यात येणार आहे. शहरातील चेन स्नेचिंग, बॅग लिफ्टींग, चोर्‍या, घरफोड्या, वाहन चोरी, जबरी चोरी यांना आळा घालण्यासाठी, वाहतुक सुलभ करण्यासाठी मुख्य रस्त्यावर नाकाबंदी पॅईंट लावण्यात आले आहेत. तसेच वाहनांची तपासणी करण्यासाठी आठ ठिकाणी फिक्सपॅईंट सुरू करण्यात आले आहेत.

हे आहेत फिक्सपॅईंट
नगर औरंगाबाद रोड शेंडीबायपास
नगर -मनमाड रोड बाह्यवळण रस्ता (एमआयडीसी)
नगर- मनमाड रोड (विळदघाट)
नगर- कल्याण रोड (नेप्ती चौफुला)
नगर- पुणे रोड (केडगाव)
नगर- दौंड रोड (अरणगाव)
नगर- सोेलापुर रोड (वाळुंज)
नगर- जामखेड व पाथर्डी रस्ता (भिंगार नाला)

नगर तालुक्यातील अपघात
2016 मध्ये 38 अपघात झाले असून यात 33 पुरूष, आणि 7 स्त्रिया मयत झाल्या आहेत. याच वर्षात 47 गंभीर अपघात झाले असून यात 49 पुरूष आणि 6 स्त्रिया मयत झाल्या आहेत. जानेवारी 2017 मध्ये 21 अपघात झाले आहेत. यात 19 पुरूष आणि 4 स्त्रिया मयत झाल्या आहेत. याच महिन्यांत गंभीर अपघातात 9 पुरूष आणि 3 स्त्रिया मयत झाल्या आहेत. हे अपघात नेप्ती फाटा, नेप्ती शिवार, निमगाव फाटा, निमगाव वाघा, जखणगावचा बाह्यवळण रस्ता, चास शिवार, चास बस स्थानक, चास नदीचा पुल, कामरगाव नदीचा उतार, कामरगाव शिवार.

भिंगार हद्दीत 2016 मध्ये 20 अपघात झाले असून यात 17 जीव गेला आहे. यात 9 पुरूष आणि 8 महिलयांचा समावेश आहे. 2017 मध्ये या ठिकाणी 20 अपघात 9 मयत झाले असून यात 7 पुरूष मयत 7 आणि 2 स्त्रियांचा समावेश आहे. भिंगार शहर, नगर- सोलापुर रोड, नगर-जामखेड रोड, नगर-औरंगाबाद रोड, चांदणी चौक, नागरदेवळा, पाथर्डी रोड, स्टेट बँक चौक, शहापुर शिवार, निमोन रोड, डिएसपी चौक हे भिंगार परिसारातील अपघात प्रवर्णक्षेत्र आहे.

एमआयडीसी हद्दीत 2016 मध्ये 53 अपघात 59 पुरूष आणि महिला मयत झाल्या आहेत. 2017 मध्ये 23 अपघात 27 पुरूष आणि स्त्रीया मयत झाल्या आहेत. इमामपुर घाट, पांढरीचा पुल, शेंडी बायपास, निंबळक, देहरे, शिंगवे, विळद बायपास, सद्याद्री चौक, नवनागापुर, नागापुर, धनगरवाडी शिवार हे अपघात प्रवर्णक्षेत्र आहे.

कोतवालीच्या हद्दीत 2016 मध्ये 20 अपघात 14 पुरूष आणि 6 स्त्रिया मयत आहेत. 2017 मध्ये 30 अपघात 3 पुरूष 3 स्त्रिया मयत आहेत. केडगाव पायपास, स्वस्तिक चौक, नगर कॉलेज, रेल्वे पुल, केडगाव, कायनॉटीक चौक, माळीवाडा बस स्थानक प्रवेशद्वार, मार्केटयार्ड चौक, नेप्ती रोड. हे अपघात प्रवण क्षेत्र आहे.

तोफखाना हद्दीज 2016 मध्ये 17 अपघात झाले असून यात 14 पुरूष आणि 3 स्त्रिया मयत आहेत. 2017 मध्ये 10 अपघात 10 पुरूष मयत आहेत. मनमाड रोड, नगर कल्याण रोड, नगर औरंगाबाद रोड, पत्रकार चौक, डीएसपी चौक, प्रेमदान चौक, कॉटेज कॉर्नर, नेप्ती चौक, बायपास रोड हे अपघात प्रर्वणक्षेत्र आहे.

अपघाताची कारणे
वाहनांचा वेग, अवजड वाहने, नियमाची पायमल्ली, वाहनांमध्ये बिघाड, तुटलेले दुभाजक, रस्त्याच्या कडेला पडलेली माती, गतिरोधक, वाहन चालकांचा बेजबाबदारपणा, गावाचे ठिकाण, वळण, खड्डे, रस्ता पार करतांना, यु टर्णची ठिकाणे, रहदारीची किंवा वर्दळीची ठिकाणे, चुकीच्या मार्गाने प्रवेश, रस्त्याच्या कडेची कोर, स्टंटबाजी, रेस, मद्यपी, अवाजवी वाहतुक, बिघडलेले सिग्नल, ट्राफिक पोलीसांची भीती ही अपघाताची कारणे आहेत.

LEAVE A REPLY

*