Type to search

आवर्जून वाचाच विशेष लेख

जीवन एक संघर्ष

Share

मनुष्य जिवन मिळण हे फार मोलाच आहे. ते परत-परत मिळत नसत. जिवन हे एक संघर्ष आहे. या संघर्षांना जो सामोरे गेला. त्याचे जिवन चांगल्याप्रकारे घडते. जिवनात वेगवेगळ्या अडी-अडचणी, यश-अपयश, सु:ख-दु:खांना तोंड द्यावे लागते. या सर्व गोष्टींना तोंड देत असतांना जो खचला त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होतच नाही. शिवाय अश्या व्यक्ती आत्महत्या सारख्या प्रकाराकडे वळतात. किंवा व्यसनाधिन बनतात. आपल मिळालेल अनमोल जिवन संपवतात. आत्महत्या करणे हा काही या गोष्टीवील उपाय नाही. जिवन हे त्या परमेश्वराने दिलेली अनमोल अशी देणगी आहे. जिवन जगतांना व्यक्तीने जिवन किती जगला याला महत्व नसते. तर ती जीवन जसे जगला याला जास्त महत्व असते.

जिवन आहे चढउतार, मानु नकोस तू हार,
मागे वळुन पाहु नकोस, मागे आहे अंधकार,
पुढे-पुढे चालत रहा, पुढे आहे प्रकाश

यशाच्या पायर्‍या चढत रहा, स्वागत करीत भविष्यकाळ, या सजीवसृष्टीवर परमेश्वराने मनुष्यप्राणी, जिव-जंतु सगळ्यांना जन्म दिला. तेव्हा त्यासोबत संकटही दिले आहे. तसेच या संकटांचा सामना करण्यासाठी साहस आणि हिंमतपण सगळ्यांना दिली आहे. म्हणून मिळालेल्या या जिवनात अस काही करून दाखवा की समोरच्या व्यक्तीवर आपला प्रभाव पडला पाहिजे. मिळालेल्या या जिवनाचा आपला प्रभाव पाडला पाहिजे. मिळालेल्या जिवनाचा वापर आपण कसा करायचा हे दुसर्‍यांच्या नाही तर आपल्याच हातात आहे. आपण काही कुण्या दुसर्‍याच्या भरोश्यावर जन्माला आलो नाहीये. जिवनात प्रत्येक जण पाहत असलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यामागे धावपळ करत असतो. समाधानी जिवन जगणे हेच मिळालेल्या जिवनात कानमंत्र? आहे. जिवनात ‘तारूण्यपण’ सर्वात मोठी महत्वाची पायरी आहे.

वाटेवरून जाता-जाता रिकाम जायच नसत
जगण्याच हेतुने काहीतरी मिळवायच असत
इकहे आड तिकडे विहिर होऊ द्यायच नसतं
असच हसत-खेळत जिवन जगायच असत

जिवन मिळल्यावर ते वाईट कामासाठी न वापरता योग्य कामासाठी वापरले पाहिजे. जिवन हे एक गुलाब आहे.

त्या गुलाबांचा सुगंध अनुभवण्यासाठी काट्यांना सामोरे जावेच लागते? कारण संकटांना सामोरे गेले तर आपल्याला त्यातून जगण्याची एक प्रेरणा मिळते. जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंतचा काळ म्हणजे जीवन होय. पृथ्वीवरती मानवी जीवन सोडले तर कोणताही प्राणी जिवांना आपल्या सुखसुविधा भागवता येत नाही. ज्या मनुष्याने जन्माला आल्यापासून काहीच केल नाही. तर तो कसल जिवन जगला हे त्यालाच माहित. याला काही महत्त्व नाही. तर आपण असं काही करून जा की आपण गेल्यानंतरही आपल नाव पिढ्यांपिढ्या निघाल पाहिजे.

जिवन हे दोन घडीचा डाव आहे
कधी ऊन तर कधी सावली आहे
तर कधी मनुष्याच्या कोमल मनावर
होणारा संघर्षाचा घाव आहे,
मनुष्याला जिवनात सगळ काही करता येत पण आज काय करण्याची इच्छा शक्तीच राहीली नाही. आजची परिस्थिती फक्त कमी काम पण जास्त दाम अशी झाली आहे. मनुष्य हा जिवनात कमी काम पण जास्त दाम. अशी झाली आहे. मनुष्य हा जिवनात स्वत:च आपले निर्णय घेत असतो. मग ते निर्णय चांगले असो की वाईट हे ती पडताळून बघत नाही. जेव्हा त्याला कळत तेव्हा मात्र ती वेळ परत येत नाही. मनुष्याने कोणताही डाव अर्ध्यावर सोडू नये, आलेल्या प्रसंगाला न घाबरता त्याला सामोरे जायला शिकायला पाहिजे. तेव्हा ते सुरळीत जगता येईल. जिवन कधी दु:खाची आहे, तर कधी सुखाची पहाट आहे. जिवन हे जळत्या मेणबत्तीसारखे असते. मेणबत्ती ही आपल्या मनाप्रमाणे जगु शकत नाही किंवा टिकू शकत नाही. तिचा जळण्याचा काळ संपला कि ती झिजून जाते. पण ती पेटत असतांना आपल्याला प्रकाशाचा मार्ग दाखवत असते आणि प्रसन्न करून जाते. म्हणून आपण सुध्दा जिवनात येऊन कोणत्याही दु:खी न करता. आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि स्वत:ही आनंदात रहा. जिवन हे क्षणभंगुर आहे. ते केव्हा नष्ट होइल हे आजपर्यंत कोणलाही सांगता आल नाही. म्हणून जिवनात येवून स्वार्थी भावना न ठेवता जीव-पणाला लावून जीवन जगतो. जिवनात यश-अपयश येतच असतात. त्याला सामोरे जाऊन जिवन जगावे. जन्म जिवनात आपल्याला एकदाच मिळतो. कारण हा जन्म परत मिळतो की नाही हे पण कोणी सिध्द करू शकत नाही.

जिवनात कोणत्याही कामाची लाज न ठेवता ते आवाहन म्हणून स्विकारले पाहिजे आणि ठरवलेल ध्येय पूर्ण केल पाहिजे. आज मोदीजींसारख एवढ मोठ उदाहरण आपल्यासमोर आहे ते चहा विकत होते ट्रेनमध्ये आणि ते आज भारताचे पंतप्रधान आहेत. त्यांची स्वप्न किती मोठी होती. त्यांनी कोणत्याच कामाची लाज न बाळगता आपले स्वप्न पूर्ण केलेच ना. मग आपण पण स्वप्न बघायला सुरवात कराना नाही डॉक्टर इंजिनीयर बनले तर काय झाल पण डिग्री तर मिळवू शकता. स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करा. श्रम हेच सर्व सुखाचे मुळ आहे. जिवनात जर सगळा आनंद उपभोगायचा असेल तर स्वप्न, प्रयत्न आणि श्रम आवश्यक आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. घरी बसून काहीच होणार नाही. आणि आपली वाणी नेहमी गोड ठेवा. कारण काम हेच जिवन आहे. आणि जिवन हेच काम आहे. म्हणून जिवन जगतांना संघर्ष करूनच जिवन जगायला पाहिजे.

भित्रेपणाने जगला तर या दुनियेतील लोक तुम्हाला जगु पण देणार नाही आणि मरूपण देणार नाही. लक्षात ठेवा पैसा-अडका कसाही कमवता येतो पण इज्जत मात्र खुप कठीण आहे. तिला कमवायला खुप वेळ लागतो. पण गमवायला एक मिनीटपण लागत नाही. बाकी आपण विचार करण्याएवढष नक्कीच हुशार आहोत. मग आपण मिळालेल जिवन कश्या पध्दतीने जगायच हे दुसर्‍या कोणाच्याच हाता नाही. आपल्याच हातात आहे. मग आजपासून स्वप्न बघायला सुरूवात करा. मोदिजींसारखा पंतप्रधान नाही झाले तरी चालेल पण गावाचे सरपंच तर होऊ शकता. बघा प्रयत्न करून आणि श्रम करण्याच्या मागे परमेश्वर पण खंबीरपणे उभा राहतो शेवटी एवढेच सांगेन.
तु स्वत:च शोध तुझ्या आयुष्याचा अर्थ
सुखात भारावून जाऊ नकोस
दु:खात होरपळून जाऊ नकोस
जिवनाच्या वाटेवर चालतांना
मागे वळू कधीच पाहु नकोस
नेरी बु॥, ता.जामनेर
– भुषण अरविंद खोडपे, मो.9421521884

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!