जीवनात काहीही झालं तरी अरबाज माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग राहिल : मलायका

0

अरबाज खान आणि मलायका अरोरा विभक्त होऊन आता बरेच महिने लोटले आहेत.

घटस्फोटानंतरही बऱ्याचदा हे दोघं एकत्र दिसले. काही दिवसांपूर्वी मलायकाने अरबाजच्या वाढदिवसाला खास केकही मागवला होता.

घटस्फोट झाला असला तरी या दोघांमधील मैत्रीचे आणि कौटुंबिक नाते अद्याप तसेच असल्याचे मलायकाच्या मुलाखतीतून आता स्पष्ट झालेय. मलायकाने ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.

मुलाखतीत मलायकाला आताच्या तिच्या ‘सिंगल’ स्टेटसबद्दल विचारण्यात आले. तसेच ती अजूनही खान आडनाव लावते का? असा सवालही करण्यात आला. त्यावर मलायका म्हणाली की, ‘होय, मी अजूनही खान आडनाव लावते. मी सिंगल असल्याचा एवढा काही विचार केलेला नाही. खरं सांगायचं तर हा फार विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे असे म्हणता येणार नाही. जे काही घडायचं ते घडेल. नशीब मला कुठे नेतय ते बघू.’

मलायका आणि अरबाज हे केवळ पती – पत्नीच नव्हते तर ते आधीपासूनच एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आजही खान कुटुंबात काहीही समारंभ असला तरी मलायका तिच्या बहिणीसह तेथे हजर असते. अरबाज तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. याविषयी मलायका म्हणाली की, अरबाज माझ्या कुटुंबाचा भाग असून, तो माझ्या मुलाचा बाबा आहे. काही समीकरण एका रात्रीत बदलत नाहीत. त्या गोष्टी अद्याप आमच्यामध्ये अजूनही तशाच आहेत. हे खासगी आहे. आम्हाला कोणालाच काहीही सिद्ध करुन दाखवण्याची गरज नाही. त्याला भेटल्यावर माझ्या मुलाला आनंद होतो. त्यामुळे मलाही आनंद होतो. अमृतासाठी तो भावासारखा असून माझे आई-वडील त्याला मुलगा मानतात. जे काही झालंय ते आमच्या दोघांमध्येच आहे. भावनिकदृष्या हे फार कठीण आहे. पण आम्ही त्याबद्दल काहीच बोलत नाही कारण, आमच्या दोघांची आयुष्य वेगळी आहेत. तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. जीवनात काहीही झालं तरी अरबाज माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग राहिल.

 

LEAVE A REPLY

*