जीएसटी लागू केल्यावर अर्थव्यवस्थेत दोन टक्केवृद्धीची शक्यता – खा.खडसे

0

भुसावळ |  प्रतिनिधी :  जीएसटी बिल लागू केल्यावर भारतीय अर्थव्यवस्थेत २ टक्के वाढीची शक्य असल्याचे मत खा.रक्षाताई खडसे यांनी दि.२९ मार्च रोजी लोकसभेत जीएसटी बिलाच्या समर्थनार्थ बोलतांना व्यक्त केले.

raksha khadse

त्या म्हणाल्या की, दहा वर्षाच्या कालावधीत बर्‍याचशा समित्या बनवल्या गेल्या, सरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या प्रयत्नांनी जीएसटी बिल पूर्णत्वास येऊन १ जुलै २०१७ रोजी लागू करण्यात येईल. आपल्या देशात १२५ करोड लोकसंख्या आहे ज्यांपैकी फक्त ७६ लाख लोक इंकम टॅक्स भरतात व त्यापैकी ६१ लाख लोक पगारदार आहेत.

वन नेशन वन टॅक्स वन मार्केट

जीएसटी टॅक्स पद्धत लागू करण्यासाठी सरकारने वित्त मंत्र्यांच्या नेतृत्वात जीएसटी कौन्सिल स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या जीएसटी कौन्सिलच्या राज्य सरकारबरोबर बैठकी व त्यांच्या सर्व प्रश्नांच्या निराकरणामुळे बर्‍याच राज्यांनी जीएसटी लागू करण्याची शिफारस या जीएसटी कौन्सिलच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केली आहे.

जीएसटी कौन्सिलने जीएसटीसाठी शुन्य टक्के, ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के व २८ टक्के असे पाच टॅक्स स्लॅब ठरवले असल्याचे त्या म्हणाल्या.

ग्राहकास केंद्रबिंदू मानून इनडायरेक्ट टॅक्स मधील हा बदल घडवलेला आहे. संपूर्ण देशात एका वस्तूवर एक टॅक्स आकारल्यामुळे वेगवेगळे टॅक्स बंद होऊन, रोज वापरात असलेल्या वस्तूंच्या किमती कमी होतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. जीएसटी ड्रॉफ्ट करतांना व्यापारी, औद्योगिक व निवासी क्षेत्रातील भाडे करार व विकास करार देखील या जीएसटीत समावेश करण्याचा प्रयत्न आहे.

शेतकरी आपली जमीन एका प्रकारे भाडेकरार रूपाने घेतो, सदर भाडेकरार सुध्दा जीएसटीत समावेश असेल का? की या भाडेकराराला जीएसटी टॅक्सपासून मुक्त ठेवले आहे, असा प्रश्‍न सभागृहासमोर उपस्थित केला. या जीएसटी बिलातील काही सुधारित बदल घडवून हे बिल लवकरात लवकर लागू करण्याची शिफारीस खा. रक्षाताई खडसे यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

*