जि.प.शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार डिजीटल शिक्षण

0

जळगाव |  प्रतिनिधी :  जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण देण्यासाठी १९ हजार रुपये प्रमाणे प्रति टॅब खरेदी करण्याचा प्रस्ताव नामंजूर करुन  कंपनीचे पण कमी किमतीचे टॅब खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

जि.प. स्थायी समितीची सभा अध्यक्षा ना. प्रयाग कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले, शिक्षण सभापती सुरेश धनके, दर्शना घोडेस्वार, मिना पाटील, सदस्य अशोक कांडेलकर, प्रकाश सोमवंशी, प्रभाकर सोनवणे, राजेंद्र चौधरी, व्ही. आर. पाटील उपस्थित होते.

जिल्ह्यातील शाळा डिजिटल करत विद्यार्थ्यांना टॅबद्वारे शिक्षण देण्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर आहे. मार्च पर्यंत टॅब खरेदी न केल्यास निधी परत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रकाश सोमवंशी व अशोक कांडेलकर यांनी टॅब खरेदीसाठीचा निधी परत जाण्यापेक्षा ठरविलेल्या कंपनीचा चांगल्या दर्जाचा पण किंमत कमी म्हणजे साधारण सहा हजार रूपयांपर्यंत एक टॅब खरेदी करण्याचा मुद्दा मांडला. म्हणजेच ठरलेल्या किंमतीत जास्तीचे टॅब घेवून शाळांची संख्या वाढविणे शक्य होणर असल्याचा मुद्दा मांडल्यानंतर टॅब खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजरी देण्यात आली.

त्याचप्रमाणे ई-लर्निंगचे किट पुरवठा शाळांना केला जाणार आहे. हे किट ९४ हजार रूपयांप्रमाणे खरेदी करण्याऐवजी २५ ते ३० हजार रूपयांपर्यंत खरेदी करण्यास मंजूरी मिळाली.

जलव्यवस्थापन समितीची सभा

जलव्यवस्थापन समितीची जि.प. अध्यक्षा प्रयाग कोळी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सभेला समितीतील सर्व सदस्य, सीईओ आस्तिककुमार पांडेय उपस्थित होते. सभेत पाणी पुरवठा योजनतर्ंगत १६ गावांमध्ये झालेल्या पाईपलाईन गळती दुरुस्तीच्या विषयाला मंजूरी देण्यात आली.

LEAVE A REPLY

*