Type to search

जळगाव

जि. प. शाळांच्या बदल चळवळीला ग्रामस्थांचा सहभाग

Share

भङगाव। मागील 5 वर्षापुर्वी जिल्हयातील जि. प. शाळांची स्थिती बिकट होती. परंतु जिल्हयातील जि. प. शाळांमध्ये बदल झाला असुन या चळवळीला ग्रामस्थांचा सहभाग लाभत आहे. या शाळेने शिक्षणाची बिजांकुरे रोवुन अनेकांना घङविले. या शाळेच्या शैक्षणिक विकासात शिक्षकांसह पालक, ग्रामस्थांचे विशेष योगदान आहे. दात्यांनी शाळेला शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत केली. मी सर्वांचे मनापासुन अभिनंदन करतो. असे गौरवोद्गार पाचोरा भङगावचे आ. किशोर पाटील यांनी काढले. ते भङगाव तालुक्यातील वाङे येथे जि. प. प्राथमिक मुला मुलींची शाळेत आयोजीत लोकार्पण व आनंद सोहळयाप्रसंगी बोलत होते.

जि.प.प्रा. मुलामुलींची शाळा वाडे येथे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्तापुर्ण विकास व भौतिक सुविधायुक्त करण्याच्या निमित्ताने शैक्षणिक उठावा अंतर्गत गावातील नागरिकांच्या उदार दातृत्वातून मिळालेल्या लोकसहभागातून दोन लाखापेक्षा जास्त निधी जमा करून शाळा डिजिटल व भौतिक सुविधाचे उद्घाटन व लोकवर्गणी दातृत्वाचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला.

डिजिटल शाळेचे उद्घाटन पाचोरा भडगावचे आ. किशोर पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. शिक्षणसभापती पोपट भोळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन माजी जि.प. सदस्य ङॉ.कर्तारसिंग परदेशी, भडगाव पं. स. सभापती रामकृष्ण पाटील, सरपंच सारिका चित्ते, ग्रा.पं.सदस्या प्रभावती पाटील, ऊषाबाई परदेशी, सदस्य पुरुषोत्तम पाटील, युवराज माळी, संजय मोरे, दिनकरराव पाटील, साहेबराव पाटील, विकासोचे चेअरमन विश्वास पाटील, युवराज महाजन, शिवसेना जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, पाचोरा नगरसेवक भरत खंङेलवाल, पाचोरा शिवसेना प्रमुख चंद्रकांत धनवङे, प्रविण पाटील, ङॉ. प्रकाश चित्ते वाङे, नंदलाल महाजन, जालिंदर चित्ते, लक्ष्मण कुंभार, भडगाव गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, केंद्रप्रमुख नंदकिशोर बैरागी, कॉन्टृॅक्टर राजेंद्र पाटील, भगवान परदेशी, ग. स. चे संचालक सुनिल पाटील, रामा वाणी, वाचनालयाचे संचालक अशोक परदेशी, उज्वला पवार, ईश्वर पाटील, रविंद्र सोनवणे, पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील, पदाधिकारी, पालक , ग्रामस्थ वाडे हजर होते.

यावेळी शाळेला देणगी देणारे नागरीक, माजी सैनिक, शालेय व्यवस्थापन कमेटी पदाधिकारी, शाळेचे शिक्षक स्टॉफ आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, पुष्पगुच्छ, नारळ देऊन करण्यात आला. पुढे बोलतांना आमदार किशोर पाटील म्हणाले कि, वाङे शाळेची 120 वर्षाची जुनी, दयनीय स्थितीतील ईमारत असुन नवीन ईमारत बांधकाम मंजुर करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. मी व जि प चे शिक्षण सभापती पोपट भोळे आम्ही याकामी प्रयत्नशील राहु असे सांगीतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तु पाटील, आशादेवी महाले यांनी केले. तर आभार कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका शोभना पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास तालुक्यातील मान्यवर, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विदयार्थी, विदयार्थीनी, पालक, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी गोंङगाव केंद्राअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक हजर होते. यावेळी शाळाव्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍या मार्फत वाङे जि. प. शाळा नवीन ईमारत बांधकाम मंजुर करण्याबाबत निवेदन आ. किशोर पाटील व जि. प. चे शिक्षण सभापती पोपट भोळे यांना दिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!