जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना पाथर्डी, शेवगावमध्ये ‘प्रवेश’ बंदी

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – बोर्ड परीक्षावेळी मोठ्या प्रमाणात होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्याबाहेरील दहावी व अकरावीच्या विद्यार्थ्याना पाथर्डी व शेवगाव तालुक्यात यापुढे प्रवेश घेता येणार नाही.नियमाचे पालन न करणार्‍या विद्यालय व प्राचार्य, मुख्याध्यापकांवर जबाबदार धरण्यात येवून कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांनी दिली.

 

शुक्रवारी दोन्ही तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी, सर्व विद्यालयांचे प्राचार्य/मुख्याध्यापक यांची तिलौकजैन विद्यालय येथे प्रवेश प्रकियेसंदर्भात विशेष बैठक पार पडली.बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थ्याना शिक्षणाधिकार्‍यांच्या परवापनगी शिवाय प्रवेश देण्यात येवू नये अशी तब्बी संबधितांना देण्यात आली.दहावीच्या प्रवेशादरम्यानही नियमित असणार्‍या व्यतिरिक्त नविन विद्यार्थ्याना प्रवेश मिळणार नाही.

 

 

प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिल्यास कारवाई, 10 किलोमिटर अंतरापर्यत आचारसंहिता लागू करण्यात आली असून त्यापुढील विद्यालयात प्रवेश देण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील परिक्षा केंद्र संवेदशील आहे.गतवेळी मोठ्या प्रमाणात बाहेरील जिल्ह्यातील विदयार्थ्यानी कॉपी होत असल्याच्या आशेने प्रवेश घेवून पास होण्यासाठी धडपड केली.

 

 

यामुळे पाथर्डीतील केंद्र राज्यात वादग्रस्त व कॉपी बहाद्दरांचा अड्डा म्हणून ओळखले जावू लागले. अभ्यास न करताच पास होणार असल्याने दिवसेंदिवस या तालुक्यातील वाढते प्रवेश रोखून यंदाच्या वर्षीच्या बोर्ड परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने कडक पाऊले उचली आहेत.

 

 

शेवगाव व पाथर्डी व्यतिरिक्त इतर तालुक्यातील विद्यालयांची प्रवेश प्रक्रियेची तपासणी करण्यात येणार आहे.चार तास माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु होती. यावेळी पाथर्डीचे गट शिक्षणाधिकारी शिवाजी खेडकर, शेवगावचे श्री. घुगे, श्री.मगर, श्री.खेडकर, श्री.थोरे आदीसह प्राचार्य व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*