जिल्ह्यात 20 हजार हेक्टरवर पेरणी

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांनी बि-बियाणे खरेदी करण्यासाठी लगबग सुरु झाली असून जिल्ह्यात 20 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.
दरम्यान मुबलक प्रमाणात बि-बियाणे व खते उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली.
दमदार पावसामुळे पेरणीसाठी बि-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांनी कृषी केंद्रावर गर्दी केली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मात्र कृषी विभाग व जाणकार शेतकर्‍यांनी काल झालेला पाऊस पेरणी योग्य नसल्याचे अंदाज व्यक्त केला आहे. तरी देखील बर्‍याच ठिकाणी पेरण्यांना सुरवात झालेली आहे.

तर काही ठिकाणी पेरणीसाठी शेतकर्‍यांनी बि-बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. जिल्ह्यात बि-बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला शासनाकडून 47 हजार 800 मेट्रीक टन खतांचा पुरवठा झाला असून आतापर्यंत 33 हजार 245 मेट्रीक टन खतांची विक्री झाली आहे.

तसेच मागील वर्षीचे व यावर्षीचे एकुण 35 हजार 116 मेट्रीक टन खत उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. दरमयान युरिया, सुपर फॉस्पेट, पोटॅश, बीएपी ही खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

पेरणीला सुरवात
सलग दोन दिवस झालेल्या दमदार पावसाने जिल्हयातील काही तालुक्यामध्ये पेरणी सुरवात झाली आहे. जिल्हयात कापसाचे 4 लाख 68 हजार हेक्टर क्षेत्र नियोजित असून त्यापैकी जवळपास 20 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.

सलग दोन दिवस झालेल्या पावसाने पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

बि-बियाणे, खतांची टंचाई नाही
खरीपाचे क्षेत्र यावर्षी 20 हजार हेक्टर वाढल्याने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने बि-बियाणे व खतांच्या पुरवठयाची मागणी केली होती. त्याअनुषंगाने शासनाकडून खते व बियाणांचा मुलबलक पुरवठा करण्यात आल्या असल्याने यावर्षी बि-बियाणे व खताची टंचाई होणार नसल्याने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*