जिल्ह्यात 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस निरीक्षकांच्या रूपाने बदल्यांचे दुसरे गॅझेट काढले आहे. पहिल्या वेळी 171 कर्मचारी तर काल गुरुवारी 13 पोलीस अधिकार्‍यांच्या पारदर्शी बदल्या करण्यात आल्या आहेत.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर यांची मुंबईला बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी अभय परमार यांना देण्यात आले आहे.

 

तोफखाना पोलीस ठाण्याचे नारायण वाखारे यांच्या जागी राकेश मानगावकर, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात परदेशी यांच्या जागी वसंत पथवे, आश्‍वी पोलीस ठाण्यात राजेंद्र चव्हाण, शहर वाहतूक शाखेत अजित लकडे यांच्या जागी प्रसाद गोकुळे, शिर्डी वाहतुक शाखेत दौलत जाधव, साई सुरक्षा मंदिर येथे नितीन चव्हाण यांच्या जागी कुबेर चवरे, ट्रायल मॉनिटरिंग सेल शाखेला अनिल कटके, तोफखाना पोलीस ठाण्यातून बदलून केलेले नारायण वाखारे यांची बदली मानव संसाधन शाखेत, राजेंद्र पडवळ जिल्हा वाहतूक शाखेत, राजेंद्र पाटील शिर्डी वाहतूक शाखा ते जिल्हा विशेष शाखा, बाळकृष्ण कदम नियंत्रण कक्ष ते राहाता पोलीस ठाणे, सुनील पवार नियंत्रण कक्ष ते सुपा पोलीस ठाणे अशा 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
या बदल्या रंजनकुमार शर्मा यांनी पारदर्शक केल्या असून येत्या दोन दिवसांत पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचारी सर्वच व्यवस्था बदलली जाणार असून नवे गडी नवे राज्य अशा परिस्थिती पाहावयास मिळणार आहे.

 

उपनिरीक्षकांच्या जिल्हाबाह्य बदल्या
जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक छबीलाल गावंडे नगर ते नागपूर, मुंजाजी नामदेव दळवे (नांदेड), अन्सार अहमद शेख (नाशिक शहर) या तीन अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. तर अशोक नामदेव उजागिरे, महेश कैलास क्षीरसागर, विकास नामदेव काळे, अन्सार राजमहंमद इनामदार या चार अधिकार्‍यांच्या विनंत्या अमान्य करण्यात आल्या आहेत. मात्र शासनाच्या गॅझेटमध्ये एकही पीएसआय नगर जिल्ह्यासाठी मिळाला नाही.

LEAVE A REPLY

*