जिल्ह्यात सर्वप्रथम पाडळसे येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘आपले सरकार’ सेवा केंद्र सुरु

0

पाडळसे, ता.यावल |वार्ताहर :  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जळगाव जिल्ह्यात सर्व प्रथम पाडळसे ता.यावल येथे आपले सरकार सेवा केंद्राचे आ.हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडिल शासन निर्णय क्र. संग्राम-२०१५/प्र.क्र. ९३/संग्राम कक्ष मंत्रालय मुंबई दि. ११ ऑगस्ट २०१६ अन्वये ग्रा.पं.पाडळसे येथील दि. १५ ऑगस्ट २०१६ रोजीच्या ग्रामसभेमध्ये ठराव करून गावी आपले सरकार सेवा केंद्र सुरू करणेबाबत निर्णय घेण्यात आला.

त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी पं.स.यावल यांचे मार्ङ्गत मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. जळगाव यांचेकडे प्रस्ताव सादर करून त्यास मान्यता घेण्यात आली. आपले सरकार केंद्र पाडळसेचे आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आ.हरिभाऊ जावळे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी भागवत बर्‍हाटे यांचा दाखला आमदारांनी ऑनलाईन काढून वितरीत केला. या केंेद्रामार्ङ्गत जनतेला १९ प्रकारचे ऑन लाईन दाखले वितरित केले जाणार आहे.

यावेळी जि.प.सदस्या नंदा सपकाळे, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे, कृउबा संचालक नारायण चौधरी (बापू), सहा. ग.वि.अ. किशोर सपकाळे, सरपंच पाडळसे योगराज बर्‍हाटे, सं.गा.नि.यो. अध्यक्ष विलास चौधरी, विजय मोरे कासवे, राजेंद्र सपकाळे वनोली, माजी सरपंच अंजाळे भिमराज कोळी, सांगवीचे महेंद्र कोळी, आपले सरकार सेवा केंद्र जिल्हा व्यवस्थापक किशोर धोटे, यावल गटव्यवस्थापक भुषण जोशी, ग्रा.पं.सदस्य प्रदीप चौधरी, खेमचंद कोळी, ज्ञानेश्‍वर तायडे, अनिता कुंभार, दगडू कोळी, पोलिस पाटील सुरेश खैरनार, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश लोहार, प्रभाकर तायडे, यशवंत चौधरी, ऑपरेटर सुलतान पटेल, म.गां. रो.ह. कक्ष यावल नेमचंद बर्‍हाटे, ग्रा.पं.कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार ग्रा.वि.अ. संजय भारंबे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*