Type to search

जळगाव

जिल्ह्यात विहिरींनी तळ गाठल्याने बोअरवेल खोदकामाचा सपाटा!

Share

जळगाव । जिल्ह्यात दुष्काळामुळे यंदा पाणीटंचाईचे भीषण संकट गडद झाले आहे. जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, प्रकल्पही आटले असून विहिरींनी तळ गाठला आहे.परिणामी टंचाईग्रस्त गावांना टँकरवर मदार राहिली. मात्र पुरेसे मिळत नसल्यामुळे पाण्यासाठी हाल होत आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात बोअरवेल खोदकामाचा सपाटा सुरु आहे.

यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने सुरुवातीपासूनच नदी, नाले कोरडी पडली आहेत. नोव्हेंबर- डिसेंबरपासून नागरिकांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. आता मे महिना सुरु असून अजून दीड ते दोन महिने पावसाळा सुरु होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. तापमानाचा पारा 42 ते 45 अंशावर गेला आहे. या ठिकठिकाणच्या गावातील विहिरी, बोअरच्या पाणी पातळीखाली गेल्याने बरेच हातपंप बंद पडले आहेत. तर विहिरीसुद्धा आटू लागल्या आहेत. जळगाव शहर व जिल्हा परिसरात बाहेर राज्यातील बोअर मशिन दाखल झाले असून जिथेजिथे बोअरवेल खोदण्याचा सपाटा सुरु आहे. सर्व नियम धाब्यावर बसून खोदकाम होत आहे. 200 फुटाच्या मर्यादेचे उल्लंघन केले जात आहे. याकडे संबंधित प्रशासनाची दुर्लक्ष होत आहेत. यावर्षी अल्पप्रमाणात पाऊस झाल्याने ग्रामीण भागातील नदी नाल्यांना पूरच आला नाही. त्यात पिकाची आणेवारी एकदम घटली आहे. पिके हातची गेली असून उत्पन्नात मोठी घट झाली आहे. रब्बी हंगामासाठी पाणी नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. यावर्षीचा रब्बी पिकाचा हंगाम गेला. पिकविलेल्या मालाला योग्य भाव वेळेवर न मिळाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहेत. जिल्ह्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्याची पातळी एकदम खालावली आहे. यामुळे पाण्याचा शोध घेत बोअरवेल खोदले जात आहे. परप्रांतातील बोअरवेल मशिनचालक या भागात दोन महिन्यांपासून डेरे दाखल झाले आहेत. त्यांनी सर्व नियमांना बगल दिली आहे. 200 फुटांपर्यंत परवानगी असतांना 500 ते 600 फुटापर्यंत बोअरवेल खोदली जात आहे. शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी बोअरवेल मशिन तेलंगणा, आंध्रप्रदेश आदी प्रांतातील बोअरवेल मशिनवाले आले असून अनेक दिवसांपासून बोअरवेल खोदकाम सुरु आहे. त्यांनी दलालीच्या माध्यमातून आपला व्यवसाय चालवला आहे. यासंदर्भात कुठलीही परवानगी घेतली जात नाही. बोअरवेल किती खोदली याची माहिती दिली जात नाही. याप्रकाराकडे प्रशासन लक्ष देईल काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कायदा व नियम पाळावे!
शासनाने प्रस्तावित उपकर लावू नयेत आणि अपीलासंदर्भातील फी केवळ नाममात्र ठेवावी. भूजल वापरकर्त्यांनी देखील कायदा व नियम यांच्याकडे आवश्यक पथ्य म्हणून पहावे आणि प्रसंगी कटू वाटले तरी औषध म्हणून ते स्वीकारावे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!