Type to search

Featured मुख्य बातम्या राजकीय सार्वमत

जिल्ह्यात राष्ट्रवादीने 9 जागा लढवाव्यात ; फाळके यांचा अहवाल

Share

 अ‍ॅड. ढाकणेंचे पक्ष संघटनेच्या मरगळीवर बोट

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजण्याऐवढ्याच विधानसभेच्या जागांवर काँग्रेसची ताकद असल्यामुळे संगमनेर, श्रीरामपूर आणि राहाता वगळता उर्वरित नऊ मतदारसंघावर राष्ट्रवादीने उमेदवार द्यावेत. त्या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद अधिक असल्याचा अहवाल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडला.

याच वेळी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यासमोर जिल्ह्यात पक्ष संघटनेत आलेल्या मरगळीवर बोट ठेवत पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी जिल्हाध्यक्ष फाळके यांच्या कार्यशैलीवर एकाप्रकारे नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब जगताप यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांच्यावर टाकण्याची मागणी केली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी भवन येथे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी जिल्हानिहाय बैठका घेतल्या. शुक्रवारी सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान, नगर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नेत्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षाची स्थिती सादर केली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, आ. दिलीप वळसे पाटील, जिल्हा निरिक्षक अंकुश काकडे, शिवाजी गर्जे, रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, इर्श्‍वर बाळबुधे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातून आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप, जिल्हाध्यक्ष फाळके, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, ज्येष्ठ नेते दादा कळमकर, जिल्हा परिषदेचे सभापती कैलास वाकचौरे, सभापती उमेश परहर, माजी आ. नरेंद्र घुले, विठ्ठलराव लंघे, अ‍ॅड. प्रताप ढाकणे, घनश्याम शेलार, अविनाश आदिक, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, राजेंद्र गुंड, अरूण कडू, मच्छिंद्र सोनवणे, अशोक कदम, शब्बीर शेख, निर्मला मालपाणी, धनराज गाडे, अमृत धुमाळ, सचिन मुजगले, सुनील शिंदे, रोहिदास होन, माधव खिल्लारी, दिलीप शिंदे, बबलू वामन, दादासाहेब गंडाळ, राजेंद्र कोठारी, शहाजी राळेभात, निलेश लंके, अभिषेक कळमकर, किरण काळे, प्रशांत जगताप, संतोष आघाव, मीनानाथ पांडे, मधुकरराव नवले, आशा फाफळे, काकासाहेब तापकिर आदी उपस्थित होते.

सुरूवातीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्ह्यातील लोकसभेला मिळालेली मतांची आकडेवारी सादर केली. तसेच जिल्ह्यात 12 मतदारसंघापैकी केवळ तीन मतदारसंघात काँग्रेसची ताकद असून उर्वरित ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद असल्याने त्या ठिकाणी पक्षाने उमेदवार उभे करावेत, अशी मागणी केली. प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. ढाकणे यांनी जिल्ह्यात पक्ष संघटनेत आलेल्या मरगळीवर बोट ठेवले. पक्षात पूर्वी प्रमाणे कौटुंबिक वातावरण राहिलेले नाही. तालुकानिहाय आणि जिल्ह्याच्या कार्यकारिणीची नियमित बैठक नाही, ही बाब अध्यक्ष पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. जगताप यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आता 100 दिवसच बाकी असून जिल्हाध्यक्षपदाची धुरा ज्येष्ठ नेते कळमकर यांच्यावर सोपविण्याची मागणी केली.

तालुकानिहाय आढाव्या दरम्यान पुलवामा हल्ल्याचा प्रभाव, युवकांचे भाजपकडे असणारे आकर्षण, योजनांची भाजपकडून प्रभावी मतदारांसमोर केलेली मांडणी यावर नेते आणि कार्यकर्त्यांनी मंथन केले. तसेच या बाबत आपण कमी पडल्याचे मान्य केले. यावेळी राहुरीचे दिवंगत नेते शिवाजी गाडे यांचे चिरंजीव धनराज गाडे यांचा सत्कार करण्यात आला.
……………….

कर्जत-जामखेडमधून इच्छुक असणार्‍या मंजुषा गुंड यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रवादीने महिलांना 50 टक्के आरक्षण दिले. मात्र, विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना प्राधान्य दिले जात नाही. त्या स्वत: विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत-जामखेडमधून इच्छुक असल्याचे स्पष्ट केले.
…………….
राहुरी मतदारसंघात भाजपचे आ. कर्डिले आणि राष्ट्रवादीचे उमदेवार आ. संग्राम जगताप यांचे नातेसंबंध असल्याने, या ठिकाणी राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजपला मदत केल्याचा आरोप संतोष आघाव यांनी केला. मच्छिंद्र सोनवणे यांनी राहुरीतून महिलेला संधी देण्याची मागणी केली
……………
नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी करणारे आ. संग्राम जगताप, त्यांचे वडिल आ. अरूण जगताप यांच्यासह त्यांच्या नगर महापालिकेतील नगरसेवकांनी शुक्रवारी झालेल्या मुंबईतील बैठकीकडे पाठफिरवली.
………………….

तुम्ही सगळे मिळून गडाखांचे नाव सुचवू नका
नेवासा तालुक्यातील आढाव्या दरम्यान विठ्ठलराव लंघे यांनी नेते नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले आणि पांडुरंग अंभग यांच्यात एकमत असून पक्ष देईल तो निर्णय मान्य करून विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला निवडून आणण्यात येईल, असे सांगताच व्यासपीठावर असलेल्या ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी तुम्ही सगळे मिळून गडाखांचे नाव सुचवू नका, असे म्हणताच एकच हश्या पिकला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!