जिल्ह्यात पोलिसांचे 32 ठिकाणी छापे; 22 जणांना अटक

0

देशी,विदेशी,गावठी हातभट्टीसह लाखो रुपयांचा साठा जप्त

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यासह जिल्ह्यात महामार्गावरील दारु विक्री बंद निर्णय होवूनही गावो-गावी मोठ्या प्रमाणात देशी दारु विक्री सुरुच आहे. स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी तब्बल 32 ठिकाणी छापा टाकला.दरम्यान 1 लाख 4 हजार 386 रुपयांचा माल जप्त करुन एकूण 34 जणांवर कारवाई करण्यात आली आले.

 
जिल्हा पोलिस अधिक्षक रंजन कुमार शर्मा व अपर पोलिस अधिक्षक घनशाम पाटील,रोहिदास पवार यांच्या सूचनेनूसार स्थानिक गुन्हे शाखचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार व 22 पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकार्‍यांनी विदेशी, देशी व गावठी हातभट्टीची दारु पकडली.सदर दारु ताब्यात घेवून 34 जणाविरुध्द मुबई प्रोव्हिशन अ‍ॅक्टनूसार गुन्हे दाखल करुन 22 जणांना अटक करण्यात येवून संबधित पोलिस ठाण्यात मुद्दे मालासह हजर करण्यात आले. नगर तालुक्यात कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपी अनिल अशोक एडके (नालेगाव), सतिष नामदेव नरोडे (खातगाव), रशिद यासीन शेख (बारातोटी कारंजा) यांच्याकडून 4 हजार 360 रुपयांची 109 लिटर पांढर्‍या रंगाची ताडी पकडली.भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत महादेव साहेबराव काळोखे (कानडे मळा.सारसनगर) 1 हजार 820 रुपयांची देशी बॉबी सत्राच्या प्रत्येकी 52 रुपयो किंमतीच्या 35 बाटल्या ताब्यात घेतल्या.नगर तालुका पोलिस स्टेशन हद्दीत दिनकर नथुजी पवार(नेप्ती शिवार) 8 हजार रुपयांचे कच्चे रसायन व गावठी दारु, भानुदास दत्तात्रय जगदाळे (रुई छत्तीस) 5 हजार 735 रुपयांची विदेशी दारू.तोफखाना पोलिस स्टेशन हद्दीत मयुर ढवण (नगर, फरार)2500 रुपयांची 25 लिटर गावठी हातभट्टी दारु.पारनेर पोलिस ठाण्यात राजेश संजय काळे (गुनोरे) 1200 रुपयांची 30 लिटर गावठी दारु.एम.आय.डी.सी अशोक रखमाजी (क्रातीनगर,निबंळक) 1040 रुपयांची बॉबी सत्राच्या 20 बाटल्या.सुपा पोलिस स्टेशन हद्दीत अनिल पांडुरंग गाडीलकर (वाघुंडे) 632 रुपयांची बॉबी संत्रा दारु. अनिल राधाकिसन पोपळघट (सुपा,फरार)1040 रुपयांची विदेशी दारु.कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत श्रीपत मंचु जाधव (कर्जत) 14 हजार 646 रुपयांची विदेशी दारु.जामखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिठु रामभाऊ जोगदंड (पाटोदा,बीड) 520 रुपयांची संत्रा दारु,

 

 

श्रीगोंदा पोलिस स्टेशन हद्दीत मिलन रणजित सिंग (मांजरी मळा) 5 हजार 533 रुपयांची विदेशी दारु, पाथर्डी पोलिस स्टेशन हद्दीत संतोष रतन शिंदे (माणिक दौंडी), आजिनाथ ज्ञानदेव चितळे (पाथर्डी), काकासाहेब देविदास शिंदे (तिसगाव), जालिंदर साहेबरास सरोदे, सोपान लक्ष्मण शेंडे (आडगाव), किशोर फुलारी यांच्याकडून एकूण 19 हजार 901 रुपयांची देशी व हातभट्टीची तयार दारु.शेवगाव पोलिस स्टेशन हद्दीत संदिप किसनसिंग रजपुत (कांबी) राजेंद्र श्रीधर गायधने (आखेगाव),सलीम सय्यद (फरार) 3435 रुपयांची विदेशी दारु.

 

 

नेवासा पोलिस ठाणे: शकुंतला विश्‍वनाथ अहिरे(माळी चिंचोरा) 4 हजार 900 रुपयांची देशी व हातभट्टी दारु.सोनई पोलिस ठाणे: रमेश किसन जाधव (माका) 520 रुपयांची देशी दारु.शनिशिंगणापुर पोलिस स्टेशन:रोहन पावलस वोनावळे (वडाळा बहिरोबा) 416 रुपयांची देशी दारु.श्रीरामपूर पोलिस स्टेशन: मिनां लाला माने (सरस्वती कॉलनी)जिजाबाई विष्णु जाधव 3600 रुपयांची गावठी दारु.

 

 

संगमनेर पोलिस ठाणे: विश्‍वनाथ लहानु आव्हाड (राजापुर.गावठाण)सिध्दार्थ शेषराव पैठणे (अकोले नाका, कासारवाडी रोड) 8 हजार 440 रुपयांची विदेशी दारु. अकोले पो.स्टे : अनिस बाबु पटेल (ब्राम्हणवाडा) 1092 रुपयांची विदेशी दारु, राजुर पो.स्टे शांताराम सुकदेव धात्राक 936 रुपयांची संत्रा दारु, कोपरगाव पोलिस शहर स्टेशन: कमलाबाई बापु लोणारी (गोपाळवाडी, शिंगणापुर) 600 रुपयांची गावठी दारु व कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीत विजय चंदू मोहरे (कुंभारी) 520 रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली.

 

 

दरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध दारु विक्रीवर करण्यात आलेल्या कारवाईत तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

राहाता,राहुरीकडे दुर्लक्ष?
जिल्हा दारु मुक्त करण्यासाठी विविध संघटना व सामाजिक कार्यकत्यांनी धडपड सुरु केली.ग्रामपंचायती ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी ठराव घेवून प्रशासनाकडे सादर करत आहे.दरम्यान जिल्हा पोलिस प्रशासन अवैध दारु विके्रत्यांची धरपकड करत आहे. राहुरी व राहाता तालुका वगळता सर्वत्र कारवाई करण्यात आली.या तालुक्यातील अवैध दारु विक्रेत्यांच का??असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.सध्या पान टपरी,किराणा दुकान, चप्पल दुकान अशा विविध ठिकाणी दारु विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असताना स्थानिक पोलिस बघ्याची भुमिका घेत आहे.त्यामुळे इतर तालुक्याप्रमाणे राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील गावांकडे स्थानिक गुन्हे शाखेने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

*