जिल्ह्यात नवमतदार नोंदणी मोहीम

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी व नागरिकांमध्ये निवडणूक मतदार यादी विषयीची जनजागृती करण्यासाठी जिल्हाभर 1 ते 31 जुलै या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
मतदार नोंदणी कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी माहिती दिली. 1 जानेवारी 2017 पासून भारतीय नागरिकांचे वय 18 पूर्ण आहे. अद्याप नाव नाही, अशा लोकांची नोंदणी करण्यासाठी अर्ज नुमना 6 भरुन घेण्यात येणार आहे. त्यासाठी नियुक्त बीएलओ घरोघरी जावून फॉर्म भरुन घेणार आहे. मोहिमेत मयत, दुबार, स्थलातरीत मतदारांची नावे वगळण्यासाठी नागरिकांनी स्वत: हून अर्जनमूना 7 भरून द्यावा. ज्या मतदाराच्या यादी मधील नावात चूका असल्यास त्या दुरस्त करण्यासाठी अर्ज नमूना 8 भरून द्यावा. अद्याप ओळखपत्रवर फोटो नसल्यास केंद्रस्तरीय अधिकार्‍याकडे जमा करावा. जिल्ह्यात पुरूष मतदारच्या तुलनेत स्त्री मतदाराची संख्या कमी आहे. त्यामध्ये वाढ करण्यासाठी महिला मतदार नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदार संघातील शहरी भागातील मतदारांना त्यांचे मतदान व केंद्राचे नाव माहित नसल्यास अशा मतदारांसाठी संकेत स्थळावर माहिती उपलब्ध करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

 मतदार नोंदणीच्या या विशेष मोहिमेत महाविद्यालयीन युवकांमध्ये जागृती होण्यासाठी महाविद्यालयात युवा मोहत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. विद्यालयात नोंदणीसाठी फॉर्मचे वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यात मतदारांची संख्या वाढविण्यासाठी विविध राजकीय पक्षाची मदत घेतली असून त्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात 21 जून रोजी मतदार यादी जनजागृती करण्यासाठी  जिल्हा व तालुका स्तरावर रंगोळी, निंबध,वकृत्व व चित्रकला स्पर्धोंचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*