जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

0
धुळे / शहराला तब्बल दीड तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. वाहतूक व्यवस्था देखील ठप्प झाली होती.
शहरासह जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, काल जिल्ह्यात 86 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद महसूल विभागाकडे करण्यात आली.
धुळ्यात आज सकाळपासून ऊन-सावलीचा खेळ सुरु होता. सायंकाळनंतर वातावरणात बदल झाला. सायंकाळी 6.30 वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली.

सुरुवातीपासूनच पावसाचा जोर जास्त होता. सुमारे दीड तासापेक्षा जास्त वेळ पावसाने शहराला झोडपून काढले. यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते.

शहरातील महापालिका चौक, राणा प्रताप चौक, खोल गल्ली, ग.नं.5 चा कॉर्नर या ठिकाणी गुडघ्याबरोबर पाणी साचले होते.

पाणी साचल्यामुळे रस्त्यांवरुन वाहने काढणे देखील अवघड झाले होते. पावसामुळे व्यापार्‍यांसह हातगाडी व्यावसायीकांची तारांबळ उडाली.

दुकानांच्या तळघरांमध्ये देखील गुडख्याइतके पाणी साचल्यामुळे व्यावसायिकांची तारांबळ उडाली.

 

LEAVE A REPLY

*