जिल्ह्यात चार हजार 823 शस्त्र परवानाधारक

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – आपल्या स्व रक्षणासाठी अधिकृतपणे शस्त्र बाळगणार्‍यांची संख्या जिल्ह्यात चार हजार 823 इतकी आहे. दरोड्याच्या घटना, चोर्‍या, होणारे हल्ले यासाठी जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते आदींसह अनेकांनी स्वरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शस्त्र परवाने घेतले आहेत. तीन वर्षापूर्वी वाढलेली परवानाधारकांची संख्या गत दोन वर्षात कमालीची घटली आहे. तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी परवाने न देणेच पसंत केले. त्यामुळे परवानाधारकांची संख्या कमी आहे.

 
तालुकानिहाय शस्त्र परवानाधारकांची संख्या- अकोले-23, कोपरगाव, संगमनेर-179, राहुरी-338, राहाता-91, नेवासा-331, श्रीरामपूर-466, जामखेड-87, पाथर्डी-279, शेवगाव-137, पारनेर-128, कर्जत-343, श्रीगोंदा-472 आदी. जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेकडून प्राप्त अहवालानूसार जिल्ह्यात चार हजार 823 अधिकृत शस्त्रे परवानाधारक आहेत.

 

नगरमध्ये सर्वाधिक शस्त्र
राजकीय, सामाजिक, धार्मिक दृष्ट्या संवेदनशील असलेल्या नगरमध्ये तब्बल एक हजार 235 शस्त्र परवानाधारक आहेत. याव्यतिरिक्त जिल्ह्यासह नगर शहरात अनधिकृतपणे शस्त्रे बाळगणार्‍यांची संख्या अधिक असल्याचे गेेल्या तीन दिवसांत दोन ठिकाणी पकडलेल्या गावठी कट्ट्यातून समोर आले आहे.

 

जिल्हाधिकार्‍यांकडे मुलाखत
स्वरक्षणासाठी शस्त्र बाळगण्यासाठी परवान्याची अर्जाव्दारे मागणी केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जदाराच्या संपूर्ण चौकशी करुन त्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना देतात. अर्जदाराला शस्त्राची गरज आहे का? त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी! आदींची सखोल माहिती घेऊनच शस्त्र परवाना दिला जातो. त्यासाठी ते स्वत: अर्जदाराची मुलाखत घेतात. पात्र ठरल्यावर प्रत्यक्षात परवाना देण्याची कार्यवाही होते. शस्त्रांचा वापर बेकायदा केल्यास परवाना रद्द केला जातो.

LEAVE A REPLY

*