जिल्ह्यात केवळ जामनेरला १५ कोटीचा विशेष निधी : जळगाव महापालिकेचे २५ कोटी कोषागारात जमा : इतर पालिकांना ठेंगा

0

जळगाव |  प्रतिनिधी :  जिल्ह्यातील १२ नगरपालिकांपैकी केवळ जामनेर नगरपालिकेला १५ कोटी रूपयांचा विशेष निधी मंजुर करण्यात आला आहे. दरम्यान जळगावसाठी मंजुर असलेले २५ कोटी आज कोषागारात जमा झाल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.

राज्य शासनातर्फे वैशिष्ट्यपुर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत विशेष निधी वितरीत करण्यात आला आहे. यात चंद्रपुर, जळगाव आणि सोलापुर या जिल्ह्यातील पालिकांना तब्बल ८७ कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात १२ नगरपरीषदा आणि एक नगरपंचायत आहे.

यातील केवळ जामनेर नगरपालिकेलाच वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी १५ कोटी रूपयांच विशेष निधी मंजुर झाल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. जामनेर वगळता इतर पालिकांना मात्र शासनातर्फे ठेंगा दाखविण्यात आला आहे.

जळगावचे २५ कोटी जमा

जळगाव शहरातील विकास कामांसाठी मंजूर झालेला २५ कोटी रूपयांचा हा निधी आज जिल्हा कोषागारात जमा झाल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

*