Type to search

धुळे

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा

Share

धुळे । जिल्ह्यात विनाविलंब ओला दुष्काळ जाहीर करुन संपूर्ण कर्जमाफी करावी, रब्बी हंगामासाठी बियाण्यांचा मोफत पुरवठा करावो, अशी मागणी कुणबी सेनेने केली आहे. तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, परतीच्या अवकाळी पावसामुळे धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे ज्वारी, बाजरी, कपाशी, सोयाबीन व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्‍यांना एकरी 40 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी उध्वस्त झाला असून संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. तसेच रब्बी हंगामासाठी बियाण्यांचा मोफत पुरवठा करण्यात यावा, पिकविमा कंपन्यांना त्वरीत भरपाई देण्याचे आदेश द्यावेत. तरी शेतकर्‍यांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संदीप देवरे, उपजिल्हाप्रमुख संजय बोरसे, धुळे तालुकाप्रमुख निलेश बोरसे, शैलेश पाटील, ललित पाटील, जयेश पाटील, उत्तेजन पाटील, लक्ष्मण पाटील, सुरेश सूर्यवंशी, परेश मोरे, उल्हास रवंदळे, महेंद्र देसले आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!