जिल्ह्यात अकरावी प्रवेशाच्या 51 हजार 400 जागा

0
जळगाव । दि. 14 । प्रतिनिधी-दहावी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठीची लगबग सुुरु झाली आहे. जिल्हयात अकरावी प्रवेशाच्या 51 हजार 400 जागा आहे.
शहरात एकूण 23 महाविद्यालये असून दि.19 जून पासून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरु होणार आहे. शहरासह तालुक्यातून 9 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदा अकरावी प्रवेशासाठी शहरात 7 हजार 550 जागा उपलब्ध असून त्यात 4 हजार 895 जागा हया अनुदानित तुकडयांसाठी तर 2 हजार 655 जागा या विना अनुदानित तुकड्यांसाठी उपलब्ध आहे.

अकरावी प्रवेशसाठी कला,वाणिज्य व विज्ञान शाखांसाठी एकुण 70 तुकड्या आहेत. त्यात 44 तुकड्या या अनुदानित तर 26 तुकड्या विनाअनुदानित आहेत.

विज्ञान शाखेसाठी एकुण 3 हजार 375 जागांवर प्रवेश होणार आहेत. त्यात 1 हजार 755 प्रवेश अनुदानित तुकड्यांमध्ये तर 1 हजार 620 प्रवेश विनाअनुदानित तुकड्यांमध्ये होणार आहेत.

वाणिज्य शाखेसाठी 1 हजार 635 जागा उपलब्ध आहेत. त्यात 1 हजार 305 प्रवेश अनुदानित तुकड्यांमध्ये तर 630 प्रवेश विनाअनुदानित तुकड्यांमध्ये होणार आहेत.

कला शाखेसाठी 2 हजार 5 जागा उपलब्ध आहेत. त्यात 1 हजार 700 प्रवेश अनुदानित तुकड्यांमध्ये तर 405 प्रवेश विनाअनुदानित तुकड्यांमध्ये होणार आहेत.

जळगाव शहर व ग्रामीण मिळून 8 हजार 975 विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तर अकरावीसाठी शहरात एकुण 7 हजार 550 जागा आहेत.

दहावी नंतर अनेक विद्यार्थी डिप्लोमा व आयटीआ साठी प्रवेश घेतात. अकरावी प्रवेशासंदर्भात दि.16 रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्या उपस्थितीत शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन मू.जे.महाविद्यालयात करण्यात आले आहे.

या बैैठकीत अकरावी प्रवेशासंदर्भाचे नियोजन ठरणार आहे. तसेच सध्या जरी 7 हजार 550 जागा उपलब्ध असल्या तरी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास जागा देखील वाढविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

आयटीआयसाठी 904 जागा
गेल्या दोन वर्षापासून आयटीआयची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने सुरु झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्येही प्रवेशाला 25 जुनपासून सुरवात होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार असून शासकीय आयटीआयमध्ये विविध 21 ट्रेंडसाठी 904 जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

जिल्हयात कला शाखेच्या 23 हजार 500 जागा
जिल्हयातील अनुदानित, विनाअनुदानित,स्वय अर्थसहाय्य, एमसीव्हीसी महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक कला शाखेच्या 23 हजार 500 जागा आहेत. विज्ञान शाखेच्या 18 हजार तर वणिज्य शाखेच्या जवळपास 6 हजार जागा आहे. जिल्हयात अकरावी प्रवेशासाठी एकूण 51 हजार 400 असून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 54 हजार 267 इतकी आहे.

 

LEAVE A REPLY

*