जिल्ह्यातील 2301 दिव्यांगांना आज साहित्य वाटप

0
जळगाव  / केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकार विभागातर्फे जिल्हयातील 2301 दिव्यांगांना विविध प्रकारची अत्याधुनिक उपकरणांचे उद्या दि.9 रोजी सागरपार्क येथे वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह ना. गुलाबराव पाटील हे उपस्थित राहणार आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारी मंत्रालयाच्या अंतर्गत भारत कृत्रिम अवयव निर्मिती प्रकल्प राबविण्यात येतो. या प्रकल्पांतर्गत दिव्यांग बांधवांना त्यांच्या गरजचे उपकरणे मोफत वाटप केली जातात.

यात 07 बॅटरीवरील तीनचाकी सायकल, 1038 साधी तीन चाकी, 1352 कुबड्या, 102 व्हिलचेअर, 9 विशेष व्हिलचेअर, 350 विशेष आधारकाठी, 810 श्रवणयंत्रे, 4860 श्रवणयंत्र बॅटरी, 150 साऊंडे प्लेअर, आधारकाठी, अंध व्यक्तिंना लेझर सेंन्सर उपकरण, ब्रेल लिपीतील मोबाईल असे जिल्हयातील 2301 लाभार्थ्यांना दि.9 रोजी विविध उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक विभागाचे राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्यासह सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे उपस्थित राहणार आहे.

तयारी पूर्ण
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकार विभागातर्फे होणार्‍या कार्यक्रमाची सागरपार्क येथे तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान प्रांताधिकारी अभिजित भांडेपाटील यांच्यासह अधिकार्‍यांनी कार्यक्रमस्थळ व हेलीपॅडची पाहणी केली.

LEAVE A REPLY

*