Type to search

नंदुरबार

जिल्ह्यातील शाळा, संस्थांमध्ये वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम उत्साहात

Share

नंदुरबार । राज्य शासनाच्या 33 कोटि वृक्षरोपण कार्यक्रमाअतर्गत जिल्ह्यातील विवीध शाळा,संस्थांमध्ये वृक्षारोपन,वुक्षदिंडी यासह विवीध कार्यक्रम आयोजीत करत वृक्षारोेपन करण्यात आले.

जीटीपी महाविद्यालय
नंदुरबार येथील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित गजमल तुळशिराम पाटील महाविद्यालयात नंदुरबार नगरपालिका यांच्या सौजन्याने वनमहोत्सव सप्ताहांतर्गत वृक्षारोपणाचा उपक्रम संस्थेचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

जी.टी.पाटील महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, राष्ट्रीय छात्रसैनिक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी यांनी जल प्रतिज्ञा घेवून वृक्षारोपणाची सुरुवात केली. यावेळी सुमारे 250 स्वयंसेवक, छात्रसैनिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. जल प्रतिज्ञेचे वाचन डॉ.मनोज शेवाळे यांनी केले.पालिकेच्यावतीने प्रातिनिधी स्वरुपात राजेश परदेशी उपस्थित होते. त्यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले. पालिकेच्या सौजन्याने एकुण 100 रोपे उपलब्ध करुन महाविद्यालयाच्या परिसरात लावण्यात आली. संस्थेच्यावतीने उपाध्यक्ष मनोज रघुवंशी यांनी सर्व रोपांचे संवर्धन करण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना करत ट्री गार्ड पुरविण्याचे आश्वासनही दिले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.श्रीवास्तव, उपप्राचार्य डॉ.आर.आर.कासारे, डॉ.महेंद्र रघुवंशी, प्रा.ए.के.शेवाळे, प्रशासकीय अधिकारी डॉ.एम.एस.रघुवंशी, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.माधव कदम, कार्यक्रम अधिकारी डॉ.अमोल भुयार, डॉ.मनोज शेवाळे, एनसीसी अधिकारी डॉ.विजय चौधरी, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.माधव वाघमारे, क्रीडा संचालक डॉ.तारकदास, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थीत होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग, विद्यार्थी कल्याण विभाग आदींनी परिश्रम घेतले.

खा.डॉ. हीना गावित यांच्या हस्ते वृक्षारोपण
राज्य शासनाच्या 33 कोटि वृक्षरोपण कार्यक्रमअंतर्गत सोरापाडा येथे खा.डॉ. हीना गावित यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावर्षी राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्षारोपण कार्यक्रमांंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा ग्रामपंचायतीने 500 झाडे लावण्याचा संकल्प घेतला आहे. खा.डॉ.हीना गावित यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी खा.डॉ.गावित यांनी सांगितले की आदिवासी समाजाची मूळ ओळख म्हणजे जल, जंगल, व जमीन अशी आहे. मागच्या अनेक वर्षात मोठ्या प्रमाणावर वन जंगलाची तोड झालेली आहे, ज्यामुळे वातावरणात अनेक बदल झालेले आज आपल्याला दिसून येत आहेत.त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे भविष्यात येणार्‍या युवापिढीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. म्हणून सरकार विविध कार्यक्रम घेत आहेत. यावर्षी 33 कोटी झाडे लावण्याचा संकल्प सरकारने घेतला आहे. म्हणून हे फक्त सरकारचे नव्हे तर आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. झाडे लावून निसर्गाचे रक्षण करणे, प्रत्येक व्यक्तीने किमान 5 झाडे लावावे व ते जगवावे, असे प्रतिपादन केले.यावेळी खा.डॉ.हीना गावित, डॉ.सुप्रिया गावित, शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विश्वास मराठे, शिवसेना तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी, नायब तहसीलदार राजेश अमृतकर, गटविकास अधिकारी सी.के.माळी, सहाय्यक ग.वि.अधिकारी पोतदार, वनक्षेत्रपाल नलिनी गिरी, सहाय्यक पो.नि. मुकेश पवार, तलाठी गणेश साखरे, प्रा.दिनेश खरात, सोरापाडा सरपंच छोटूलाल वसावे, खापरचे उपसरपंच विनोद कामे, सोरापाडा उपसरपंच ताराबाई तडवी, जगदीश चित्रकथे, वाण्याविहीर सरपंच अशोक पाडवी, अमरसिंग वळवी, ज्योति पेंढारकर, मंगला बिर्‍हाडे, शारदा पाडवी, सुनीता पाडवी, गोविंद तडवी, महेश तडवी, संतोष पाटील, रेखा चौधरीर्,े रविन्द्र चौधरी, गणेश माळी, भरत भरवाड, लाला पठान, दादू तडवी, दिलीप तडवी, बलवंत चौधरी, रवींद्र चंदेल, रोहित चौधरी, गोलू चन्देल तापसिंग वसावे आदी उपस्थित होते.

पिंपळखुंटा येथे वृक्षारोपण
जिल्हा परिषद शाळा पिंपळखुंटा येथे नुकताच वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात आला.

यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढत गावातून घोषणा देत वृक्षसंवर्धन व त्यांना जोपासण्याचा नारा दिला. झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणा देत वृक्षदिंडी गावातून काढली. विद्यार्थ्यांनी यावेळी विविध संदेश असलेले फलक सोबत घेऊन होते. त्यानंतर सर्वांसमवेत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. फक्त येथेच वृक्षारोपण न करता प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या घरीसुद्धा एक एक झाड लावून जगण्याचा निर्णय घेतला. झाडांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व आणि पर्यावरण समतोल राखण्यासाठी त्यांच्या योगदानाबद्दल केंद्रसमन्वयक गोपाळ गावीत यांनी मुलांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक गुमानसिंग राऊत यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. यावेळी संदीप बागुल, कृष्णा वळवी, शिकरसिंग पावरा, सुरेंन्द्र वळवी, सुरेश पाडवी आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. वृक्षसंवर्धन आणि त्यांची जोपासना याचे महत्त्व मुलांमध्ये यावयातच रूजविले गेले पाहिजे.या उपक्रमात विद्यार्थ्यांमध्ये वृक्षाबद्दल आत्मीयता आणि वृद्धिंगत झाले.

हरित सेना इको क्लब अंतर्गत वृक्षारोपण
वाण्याविहिर येथील सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात हरित सेना इको क्लब अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली.

अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील श्री सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात शाळेचे मुख्याध्यापक जे.के.वळवी, संस्थेचे सचिव प्रभाकर उगले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक बी.जी.भामरे, पर्यवेक्षक एस.डब्ल्यू. चौधरी उपस्थित होते. गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण किती महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पटवून दिले. शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी हरितसेनेचे शिक्षक योगेश्वर बुवा व पर्यावरण समितीच्या शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी नगिन कोते, संजय राणे, भगवान मगरे, माया जाधव, दिनेश राठोड, धनराज मराठे, देविदास मराठे, प्रदिप वसावा, केवलसिंग राजपूत, अनिल जावरे, टिना पाडवी, चारूशिला पाटील, बोरसे, सुशिल मगरे, प्रमोद माळी, किसन पाडवी, संदिप भावसार, दिनेश पवार, जयेश मराठे, विनोद पाटील, रविंद्र मराठे, पंकज मराठे, राहूल चव्हाण,चेतन पाटील, निलेश बोराणे, तुषार नाईक, प्रकाश तडवी, बैसिंग पावरा, प्रशांत कुवर, विलास शिंदे, श्री.महाले, भुपेंद्र मराठे आदी उपस्थित होते.

म्हसावद येथे वृक्षदिंडी
म्हसावद येथील प.पू.सती गोदावरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी काढण्यात येवून वृक्षारोपण, रोप वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या सुरेखा गुजर होत्या.प्रमुख अतिथी म्हणून हैदरअली नुराणी, राणीपूर वनक्षेत्रपाल एस.के.खुणे, वृक्षमित्र जगदीशभाई पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक ए.बी.पाटील यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षदिंडीची पुजा करण्यात येवून म्हसावद गावातून सवाद्य वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या. वृक्षदिंडी समारोपप्रसंगी नुराणी यांनी पुर्वीची स्थिती व सद्यस्थितीची माहिती देवून पाणी बचत, वृक्षारोपण महत्वाचे असे स्पष्ट केले. वनक्षेत्रपाल खुणे यांनी रोपेवाटप, वृक्षारोपणसाठी हरितसेनेमार्फत सातपुडा डोंगरात वृक्षारोपण,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाय.टी.पाटील यांनी झाडांचे फायदे, पाणी बचतसाठी उपाययोजनेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पर्यवेक्षिका संगीता जयस्वाल, शिक्षकवृंद, वनपाल आर.जी.लामगे, बी.के.थोरात, पी. आर.निळे, वनरक्षक उपस्थित होते. सुत्रसंचलन सुधाकर पाटील यांनी केले. आभार ए.एल.पाटील यांनी मानले.

बोरचक आश्रमशाळेत रोपट्यांची लागवड
बोरचक (ता.नवापूर) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांकडून शाळेच्या परिसरात विविध फुलांचे वृक्षारोपण करुन पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्यात आला.

मुख्याध्यापक के.व्ही.पवार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या श्रमदानातून गुलाब, मोगरा, जास्वंदी, जाईजुई, चाफा, आडुळसा, वेली, रातराणी, डोरांडो यासह विविध बोटनिकल फुलांच्या रोपांचे रोपण केले. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी रोपट्यांचे रोपण करण्यासाठी खड्डे खोदले होते. त्यानंतर जमीन भुसभुशित करुन त्या ठिकाणी विविध प्रकारची रोपटे लावलीत. यावेळी अधिक्षिका रुपाली दळवी, अमोल पवार, अर्चना जगताप, अनिल वसावे, प्रितम वळवी, देवेंद्र पाटील, श्री.चंदनखेडे, प्रियांक वळवी, मोहनदास कोकणी, श्रीमती वसावे, सुरेखा नाईक, राजीव वसावे, तानाजी वसावे, क्रीडा शिक्षक जितेंद्र माळी तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

अनुदानित आश्रमशाळा मोलगी
येथील पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मोलगी येथे वृक्षारोपण करण्यात आले. शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी प्राथमिक मुख्याध्यापक दिलीप नगराळे यांनी शासनाच्या पर्यावरण पुरक उपक्रमांची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली.यावेळी माध्यमिक मुख्याध्यापक विठोबा चौधरी यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षांच्या रक्षणाची शपथ घेत इतरांना प्रोत्साहित केले. प्रत्येक एका झाडाची काळजी घेण्यासाठी पाच मुलामुलींचा गट तयार करून झाडांची रक्षणाची जबाबदारी घेतली. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत शाळेमधील आवारात नवीन झाडे लावण्याचा संकल्प केला. यावेळी प्रत्येक वर्गशिक्षकाने आपल्या वर्गाकडून झाडे लावण्याचा संकल्प केला. यावेळी आश्रमशाळेत मुख्याध्यापक दिलीप नगराळे,विठोबा चौधरी, राहुल पाटील, राजश्री चौधरी, स्वप्निल सोनार, शिवदास वसावे, विजय चौधरी, योगिता वळवी,कल्पेश मावची,ज्योती तडवी, दिलीप पावरा, प्रमिला सोनवणे, लोटन पावरा, अनिल गावित, दिलवरसिंग वळवी,यशवंत वळवी आदी कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!