जिल्ह्यातील विविध शाळांचे माध्यमिक शालांत परीक्षेत यश

0

नंदुरबार । दि.14 । प्रतिनिधी

शेही येथील वनवासी हायस्कुल
नवापूर । प्रतिनिधी-
नेसू सेवा शिक्षण संस्था संचलित वनवासी माध्यमिक शाळेच्या दहावीचा निकाल 97.36 टक्के लागला आहे.
या परिक्षेसाठी एकूण 38 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होेत. त्यातून एकूण 37 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परिक्षेत प्रथम क्रमांकाने तेजस्वी करणसिंगी नाईक हिने 85 टक्के गुण मिळवले असून द्वितीय क्रमांक रिंकू जमसू नाईक या विद्यार्थिनीने 83 टक्के मिळविले आहेत तर सत्यवती नानसिंग वळवी हिने 80.60 टक्के मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रमेश फुलजी वळवी, मुख्याध्यापिका श्रीमती एस.एफ. गावीत यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

शेतकी विद्यालय 80.18 टक्के
कळंबू ता.शहादा । वार्ताहर-
येथील डी.जी.बी. शेतकी विद्यालयातील दहावीचा निकाल 80.18 टक्के लागला आहे.
2016-17 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परिक्षेला काल दि.13 रोजी ऑनलाईन निकाल लागला. या निकालात कळंबू येथील डी.जी.बी. शेतकी विद्यालयातील दहावीचा निकाल 80.18 टक्के लागला आहे. या परिक्षेसाठी 111 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 89 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात विशार नेरपगार याने 90.60 टक्के मिळवून प्रथम, कल्याणी मराठे हिने 87.40 टक्के मिळवून द्वितीय तर वैष्णवी बोरसे हिने 85.80 टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच उत्तेजनार्थ हिमांशू वाघारे याने 82.80 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजयराव बोरसे, उपाध्यक्ष हिंमतराव बोरसे, संचालक मंडळ, प्राचार्य संजीव सैदानशिव, पर्यवेक्षक मधुसुदन चौधरी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

वैष्णवी भामरे 91 टक्के गुणांनी उत्तीर्ण
नंदुरबार । प्रतिनिधी-
येथील एस.एमिशन इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी गोविंद भामरे हीने दहावीच्या परीक्षेत 91 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. ती शाळेतून पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल काल मंगळवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. नंदुरबार येथील एस.ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी गोविंद भामरे (ठाकूर) हीने 455 गुण मिळवून उत्तीर्ण झाली. तीने शाळेत पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. वैष्णवी ही नंदुरबार येथील न्यायालयातील वरिष्ठ लिपीक गोविंद उत्तमराव भामरे यांची मुलगी तर नंदुरबार जिल्हा अनुसूचित ठाकूर जमात मंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप ठाकुर यांची पुतणी आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.

सिटी हायस्कुलचा निकाल 75 टक्के
नंदुरबार। प्रतिनिधी- येथील अल्मीजान एज्युकेशन अ‍ॅड वेल्फेअर सोसायटी संचलित सिटी हायस्कुल नंदुरबार या शाळेतील विद्यार्थ्याां माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2017 मध्ये यश संपादन केले. शाळेत 75 टक्के निकाल 75 टक्के लागला आहे. पहिले तीन असलेले विद्यार्थ्यांचे नांव व शेकडा गुण प्रमाणे आहे. शेख दानिश मोईनोद्दीन 82.80 टक्के, मोहम्मद हुजेफा सगीर खन 82 टक्के, मन्यार मोहम्मद जाहिर हनीफ खान 81 टक्के विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक शेख मजहरोद्दीन संस्थेचे सचिव शेख मो. हनीफ मो. उमर, हाजी जकाउल्लाह इनामनदार, सैय्यद जाबीर, खान लिखाकत अली, पठाण अश्रक खान व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

दर्शन कुवर नवापूर केद्रात प्रथम
नवापूर। प्रतिनिधी- राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परिक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून यात नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी दर्शन हेमंत कुवर 98.40 टक्के गुण मिळवून नवापूर केद्रात प्रथम आला आहे. याबद्दल नवापूर तालुका शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा प्रमिलाबाई पाटील यांनी दर्शन कुवर यांचे अभिनंदन केले. यावेळी दर्शनचे वडील हेमंत कुवर, आई जयश्री कुवर, हरीश पाटील उपस्थित होते. दर्शन कुवर हा सावरट ता.नवापूर येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक हेमंत कुवर यांच्या मुलगा आहे. शाळेचा निकाल 91.60 टक्के लागला आहे.

निखील नाईकचे यश
नंदुरबार। प्रतिनिधी- येथील फत्तेसिंग नाईक यांचा मुलगा निखील फत्तेसिंग नाईक याने दहावीच्या परीक्षेत 92.20 टक्के मिळवले. त्यात श्रॉफ हायस्कुलचे योगदान मोलाचे राहिले. त्याच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पी.के.पाटील विद्यालयाचे यश
नंदुरबार- येथील पी.के. पाटील माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाला लागला त्यात प्रथम दिपक राजकुमार कुशवाह 82.80 टक्के, द्वितीय मोहन कुनू जाधव 80.80, तृतीय रोशनी ईश्वर अहिरे 75.60टक्के मिळवून उत्तीर्ण झाले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक हिरालाल चौधरी, मुख्याध्यापक महेंद्र फटकाळ यांच्या हस्ते हस्ते पुष्पगुच्छ देवून कर ण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी व पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*