Type to search

नंदुरबार

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

Share

नंदुरबार । जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात प्रचाराच्या तोफा आज सायंकांळी 5 वाजेनंतर थंडावणार आहेत.राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मतदारांनी मतदान आपल्या पक्षाला करावे यासाठी पडद्या आड व्यक्तीगत संपर्कावर भर देतील. तसेच प्रशासन देखील कामाला लागले आहे.

गेले पंधरा दिवस जिल्ह्यात सर्वत्र निवडणूकीच्या प्रचाराची राळ उठविण्यात आली होती. प्रचार रॅली, कोपरा सभा, लाऊडस्पिकरावरुन प्रचार यामुळे वातावरण ढवळून निघाले.आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रचाराची मुदत आहे.त्यांनतर चारही मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडावतील. परंतू प्रचाराची मुदत संपेल.यंदा आचार संहिता पथकाची करडी नजर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर असल्याने व सर्वत्र नाकाबंदी केलेली असल्याने कार्यकर्त्यांना उमेदवारांपर्यंत पोहचण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.

त्यामुळे आढ मार्गाने गावापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करीत आहेत. तसेच प्रशासन देखिल सुरु असणार्‍या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.त्यामुळे यंदाची निवडणूक शांततेत पार पाडण्याची प्रशासनातर्फे कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.पोलिस प्रशासनातर्फे फिरती पथके ठेवण्यात आली असून जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच शिघ्र कृतीदल व गुप्त वार्ता शाखेतर्फे देखिल पथके नियुक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नंदुरबार, अक्कलकुवा, शहादा, नवापूर या विधानभा मतदार संघात श माघार घेण्याचा शेवटच्या दिवशी 10 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात नवापूर येथे सर्वाधिक 10 तर शहादा येथे 4 उमेदवार रिंगणात आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!