जिल्हा बँकेवर 13 रोजी शेतकर्‍यांचा शिंगाडे मोर्चा

0

जळगाव / शेतकरी कर्जमाफीच्या आशेवर बसलेला होता़ कर्जमाफी तर मिळालीच नाही,

उलट ज्या प्रामाणिक शेतकर्‍यांनी पीक कर्ज भरले त्यांनादेखील जिल्हा बँक किसान क्रेडीट कार्ड सक्तीचे करुन अडवणूक करीत आहेत़.

पीककर्जाबाबत 11 मेपर्यंत निर्णय न झाल्यास दि. 13 मे रोजी जिल्हा बँकेवर शिंगाडे मोर्चा काढण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिष पाटील यांनी दिला आहे.

जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे़ अशा परीस्थीतीत त्याच्या पाठीशी उभे रहायला पाहिजे़ जिल्हा बँकेकडुन पुर्वी 10 एप्रिल पर्यंत कर्ज वाटप व्हायचे़ परंतु आता 5 मे उजाडली तरीही शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळत नसल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिष पाटील यांनी कळविले आहे.

जिल्हा बँकेकडुन शेतकर्‍यांची अडवणूक होत आहे़ पीक कर्ज मिळावे यासाठी 11 मे पर्यंत जिल्हा बँकेने निर्णय घ्यावा अन्यथा 13 मे रोजी जिल्हा बँकेवर शेतकरी शिंगाडे मोर्चा काढतील,

असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ़ डॉ़ सतीश पाटील यांनी दिला आहे़ हा मोर्चा सर्वपक्षिय राहणार असुन शेतकरीच या मोर्चाचे नेतृत्व करतील असेही आ. डॉ. पाटील यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

*