Type to search

धुळे

जिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार

Share

धुळे | धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुन्हा मानाचा नवी दिल्ली येथील प्रोमोटींग ऍचीव्हमेंट फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय स्तरावरील ‘एक्सेलन्स अवॉर्ड फॉर को-ऑपरेटीव्ह बँक डेव्हलपमेंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सदर पुरस्कार मिळविण्यासाठी बँकेने संपुर्ण भारतातील जिल्हा बँकेच्या पाचशे ते हजार कोटी ठेव असलेल्या श्रेणी नुसार बँकेने केलेली सर्वकष निकषाची पुर्तता केली. तसेच उत्कृष्ट कामकाजाची दखल घेवून बँकेस संपुर्ण भारतातून ‘एक्सेलन्स अवॉर्ड फॉर को-ऑपरेटीव्ह बँक डेव्हलपमेंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराने पुन्हा एकदा बँकेच्या परिपुर्ण सक्षम व पारदर्शक अशा कारभाराची नोंद घेण्यात आली आहे. सदर पुरस्कारासाठी बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या सर्व कर्मचार्‍यांनी गेल्या तीन वर्षापासुन टीम स्पिरीट ठेवून विविध क्षेत्रात केलेल्या सर्वकष अशा कामगिरीमुळे बँकेस मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

ठेवीदार, शेतकरी सभासदांनी बँकेवर पुन्हा एकदा विश्‍वास दाखवून जास्तीत जास्त ठेवी ठेवून सर्व प्रकारच्या व्यवहार बँकेशी करावेत, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे व मुख्य कार्यकारी अधिकारी धिरज चौधरी यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!