जिल्हा बँकेत नोकर भरती

0

465 जागा : 850 रुपयांपर्यंत परीक्षा शुल्क

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखालील विविध पदांसाठी सरळसेवा पध्दतीने मेगा भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. या भरतीच्या परीक्षेसाठी बँकेकडून प्रत्येकी 700 ते 900 रूपये एवढा परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे.

 

बँकेच्या प्रथम श्रेणी अधिकारी 7, व्दितीय श्रेणी अधिकारी 63, ज्युनिअर ऑफिसर 236, क्लेरिकल 159 अशा एकूण 465 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. प्रथम श्रेणी अधिकारी पदासाठी खुला प्रवर्ग 850, मागासप्रवर्ग 800, व्दितीय श्रेणी अधिकारी खुला प्रवर्ग 800, मागासप्रवर्ग 750, ज्युनिअर ऑफिसर खुला प्रवर्ग 750, मागासप्रवर्ग 700, क्लेरिकल खुला प्रवर्ग 700, मागास प्रवर्ग 650 असे प्रवर्ग निहाय परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे.

 

 

 

हे परीक्षा शुल्क दि. 4 जुलै पर्यंत जिल्हा बँकेच्या कोणत्याही शाखेत भरण्याची मुदत आहे.

 

लेखी परीक्षेत 40 टक्के गुण आवश्यक
नोकरभरतीसाठी 10 जूनपासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असून त्याची मुदत 30 पर्यंत आहे. या पदांसाठी 100 गुणांपैकी 90 टक्के गुणांसाठी लेखी परीक्षा होणार असून 10 टक्के गुणांसाठी मुलाखत होणार आहे. मुलाखतीसाठी लेखी परीक्षेत 40 टक्के गुण आवश्यक आहेत.

 

सदर परीक्षेसाठी भरमसाठ शुल्क भरणे विद्यार्थ्यांना अशक्य होत आहे. त्यामुळे हुशार, व परिस्थितीने गरीब विद्यार्थी यापासून वंचीत राहण्याची शक्यता आहे. तसेच उमेदवाराला इंटरनेटवरव्दारे ऑनलाईन अर्ज भरावा लागत आहे. त्यासाठी 50 रूपये द्यावे लागत आहेत. एकंदीत एका उमेदवारास अर्ज भरण्यासाठी 750 ते 900 रूपये खर्च येत आहे. सध्या ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक परिस्थितीने पिचलेला आहे. अशा कुटुंबातील विद्यार्थ्याला एवढे मोठे परीक्षा शुल्क भरणे अशक्य होत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह शासनाच्या विविध विभागाच्या नोकर भरतीसाठी वेळोवेळी परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षांना साधारणपणे 300 ते 400 रूपयांपर्यंत शुल्क आकारले जाते मात्र, जिल्हा बँक प्रशासनाने जवळपास दुप्पट परीक्षा शुल्क आकारले आहे.

LEAVE A REPLY

*