जिल्हा बँकेच्या जळगावसह अमळनेर चोपडा शाखांची सीबीआयतर्फे चौकशी

0

जळगाव : नोट बंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याच्या पार्श्‍वभूमिवर  येथील जिल्हा बँकेच्या जळगावसह चोपडा व अमळनेर येथील शाखांची केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आज सकाळपासून चौकशीस सुरवात केली आहे.

jdcc-logo

नोटा बंदीच्या काळात जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसह चोपडा व अमळनेर येथील शाखांमध्ये १५० कोटींच्या ठेवी व ३० कोटींचा कर्ज भरणा झाला होता. एकावचेळी तिन्ही शाखांची चौकशी सुरू करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्याशिवाय बँकेत कोणालाच सोडण्यात येत नव्हते.   याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही

LEAVE A REPLY

*