जिल्हा बँकेची घोगरगाव शाखा फोडण्याचा प्रयत्न

0

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील घोगरगाव येथील जिल्हा सहकारी बँकेची शाखा अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी बँकेचे शटर उचकटून आत प्रवेश केला मात्र सायरन वाजल्याने आसपासचे नागरिक जागे झाल्याने चोरटे मोकळ्या हाताने पळून गेले.

हा प्रकार पहाटे 3.30 वाजेच्या दरम्यान घटला. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बँकेचे शाखाधारी दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

*