जिल्हा बँकनोट बदली प्रकरण : सीबीआय चौकशीसाठी तिघे मुंबईत?

0

जळगाव |  प्रतिनिधी : जिल्हा बँकच्या नोट बदली प्रकरणाचे धागेदोरे जिल्हा परिषदेनंतर सुभाष चौक अर्बन क्रेडीट को-ऑप सोसायटीपर्यंत पोहचले असल्याने सीबीआयकडून चौकशी सत्र सुरुच आहे. या प्रकरणात पुढील चौकशीसाठी तिघांना दि.२९ रोजी मुंबईत बोलविण्यात आले असून तिघे मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

यात जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीईओ, नंदकुमार वाणी, ओम जहॉंगीर व सुभाष चौक अर्बन सोसायटीचे व्यवस्थापक अनिल नारखेडे यांचा समावेश असल्याचे समजते.

नोट बदलीप्रकरणी सीबीआयकडून दाखल कण्यात आलेल्या गुन्हात आतापर्यंत १० जणांची चौकशी करण्यात आली आहे. सीबीआयच्या पथकाने जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांच्यासह त्यांच्या घराशेजारील बांधकाम व्यवसायिक ओम जहॉंगीर यांची चौकशी केली होती.

तसेच यापूर्वी जिल्हा परिषदेतील सुनिल सुर्यवंशी, नंदू पवार व भुषण तायडे यांची चौकशी झाली होती. दरम्यान नंदू पवार व भुषण तायडे यांचे सुभाष चौक अर्बन के्रडीट सोसायटीमध्ये लॉकर असल्याने तसेच नंदू पवार हे सोसायटीचे संचालक असल्याने सोसायटीचे ज्येष्ठ सल्लागार भरत शहा व शाखा व्यवस्थापक अनिल नारखेडे यांंची देखील चौकशी करण्यात आली होती.

दरम्यान सीबीआयच्या पथकाला चौकशीदरम्यान आणखी काही धागेदारे हाती लागल्याने सीबीआयने जि.प.चे डेप्युटी सीईओ नंदकुमार वाणी, त्याचे बांधकाम व्यवसायातील भागीदार ओम जहँागीर व सुभाष चौक सोसायटीचे व्यवस्थापक अनिल नारखेडे यांना चौकशीसाठी मुंबईला बोलविले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

दरम्यान जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेचे व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर पाटील व रोखपाल रविंद्र गुजराथी यांना देखील सीबीआयच्या पथकाकडून चौकशीसाठी लवकरच बोलविण्यात येणार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*