जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचार्‍यांची निदर्शने

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर काशिनाथ वाघ यांनी पंचायत समितीच्या पदाधिकार्‍यांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी नगर जिल्हा परिषदेत शुक्रवारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन करत निदर्शने केली. यावेळी अध्यक्षा शालिनीताई विखे यांना निवेदन देण्यात आले.

 

चाळीसगाव पंचायत समिती गट विकास अधिकारी वाघ यांना पदाधिकारी विनाकारण त्रास देत, तसेच दैनदिन कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप, नियमबाह्य काम करण्यासाठी राजकीय दबाव, नियमबाह्य कामे न केल्यास अपमान करणे, सक्तीच्या रजेवर पाठविणे, पंचायत समितीच्या मासिक सभेस बसू न देणे या प्रकारे मानसिक त्रास देत होते. यामुळे वाघ यांनी गुरूवारी पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये विष प्रशासन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

 

 

वाघ यांनी विष प्राशन करण्यापूर्वी चार पानी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात त्रास देणार्‍या पदाधिकार्‍याची नाव लिहून ठेवलेली आहेत. त्या आधारे संबधीतावर गुन्हा दाखल कराव, अशी मागणी नगर जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी केली आहे.

 

 

आंदोलनात महाराष्ट्र विकास सेवा संघटना शाखा नगरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, प्रकल्प संचालक सुनील गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, प्रशांत शिर्के, मनोज ससे, श्रीकांत अनारसे, सुरेंद्रकुमार कदम, जिल्हा परिषदकर्मचारी युनियनचे अध्यक्ष विकास साळुंके, सुभाष कराळे, आश्रू नरोटे, एम पी कचरे, बलराज कोळी, राजू जरे, विजय औटी, शिवाजी भिटे, सचिन वाघ, सारंग पठारे, सचिन कोतकर, योगेश गवांदे, दिलीप भालेकर, किशोर शिंदे, स्मिता उंडे, भारती सांगळे, सविता कासार, शारदा ढोकळे आदी सहभागी झाले.

LEAVE A REPLY

*