Type to search

जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना युतीत मनोमिलनाचे संकेत?

जळगाव

जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना युतीत मनोमिलनाचे संकेत?

Share

जळगाव । लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना मित्रपक्षाने खांद्याला खांदा लावून काम केल्याने जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघातील दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी संघटन शक्ती कामी आली. आता जिल्हा परिषदेत सुद्धा भाजप-शिवसेना मनोमिलन होवून खांदेपालट होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु असल्याची चर्चा रंगत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युती झाली. त्यानुसार जिल्हा पातळीवर युतीची मोट बांधणीसाठी संकटमोजक ना. गिरीश महाजन यांनी पुढाकार घेवून शिवसैनिकांना सोबत घेऊन लोकसभेचा किल्ला लढविला. महायुतीच्या बळावर भाजपच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्य मिळाले. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुन पराभव झाला. युतीमुळे जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील लोकसभेचे चित्र भगवेमय झाले आहे. आता जि.प.मध्येही युती होवून शिवसेना मित्रपक्षाला सत्तेत सहभागी करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची लवकरच बैठक होणार आहे. मित्रपक्षाच्या वाटेला पूर्वीप्रमाणे खाते वाटप होणार की दोन सभापतीपद देणार याविषयी निर्णय भाजप-शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या हाती असल्याचे बोलले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!