Type to search

जळगाव

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत महिलांसाठी केळी प्रक्रिया व पुरुषांना दुग्ध प्रक्रिया उदयोगांचे प्रशिक्षण मिळणार! 

Share

 रावेर|प्रतिनिधी  – शासनाच्या विशेष घटक योजनेंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र,जळगाव व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ‘शिवणकाम’ व अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ‘केळीप्रक्रिया’ तसेच अनुसूचित जमातीच्या पुरुष व महिला उमेदवारांसाठी दुग्ध प्रक्रिया या उद्योगांचे एक महिन्याचे मोफत प्रशिक्षण रावेर येथे आयोजित केलेले आहे.

   या प्रशिक्षणासाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ च्या दरम्यान असावे.शिक्षण किमान ७ वी पास असावे.उमेदवाराने जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक,आधार कार्ड, जातीचा दाखला, बँक पासबुक च्या पहिल्या पानाची छायाप्रत, नाव बदल प्रमाणपत्र (विवाहीत महिलांसाठी) व २ फोटोसह यशवंत विद्यालयासमोरील वक्रांगी केंद्रावर दि. २५ जुलै पूर्वी अर्ज भरून द्यावा. यात आलेल्या अर्जांपैकी ३० उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात  येणार आहे.ज्या उमेदवारांची निवड होईल, त्यांना एस.एम.एस. द्वारे कळविण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण रावेर तर अनुसूचित जमातीचे प्रशिक्षण पाल येथे होणार आहे.यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र व रुएक हजार रुपये  मानधन देण्यात येणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा असे रावेर तालुका समन्वयक विजय पाटील यांनी केले आहे.
_________
अनुसूचित जमातीच्या लाभार्थी हे खालील गावांतीलच घेतले जातील.
पिम्परकुंड, निमड्या, पाल, मोरव्हाल, जिन्सी, मोह्गन, पिंपरी, अभोडे बु, सहस्त्रलिंग, गारबर्डी, मोहमांडली नवी व जुनी, अंधारमळी, तीड्या, जानोरी, चिंचाटी, लोहारे, कुसुंबे बु., कुसुंबे खु., लालमाती, पाडले बु., गौरखेडा.या गावातील लाभार्थी निवड होणार असून,आवश्यकता भासल्यास ईतर गावांतूनही घेतले जाण्याची शक्यता आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!