Type to search

क्रीडा जळगाव

जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेला जळगावात प्रारंभ

Share

जळगाव । वि.प्र. – जिल्हा क्रीडा कार्यालय (जळगाव), महानगरपालिका, जळगाव जिल्हा मल्लखांब असोसिएशन, जिल्हा क्रीडा परिषद व भाऊसाहेब राऊत विद्यालय (जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमानाने मनपा क्षेत्रीय जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन आज, शनिवारी भाऊसाहेब राऊत विद्यालयात करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे पर्यवेक्षक एल. एस. तायडे यांनी श्रीफळ फोडून केले. याप्रसंगी क्रीडाधिकारी राजेंद्र चव्हाण, जळगाव जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे पदाधिकारी प्रवीण पाटील, नीलेश पाटील, योगेश सोनवणे, जयश्री माळी, चंद्रकांत देवरे, श्री. भारुळे यांची उपस्थिती होती.

स्पर्धेचा निकाल असा : 14 वर्षे वयोगट : मुली- मोक्षदा छाजेड (सेंट टेरेसा), कोमल माळी (विद्या स्कूल), कृपा पाटील (उज्ज्वल स्कूल), अस्मिता राजपूत (एस. एल. चौधरी विद्यालय). 17 वर्षे वयोगट मुली- तनिष्का महाजन (सेंट टेरेसा), सोनाली पाटील (उज्ज्वल स्कूल), निधी जोशी (उज्ज्वल स्कूल), दिशा देवरे (सेंट टेरेसा). 19 वर्षे वयोगट मुली-देवयानी चौधरी (सेंट टेरेसा). 14 वर्षे वयोगट मुले- मनन छाजेड, मनन सुराणा (उज्ज्वल स्कूल), मोहंमद सोहेल खान (खुबचंद सागरमल विद्यालय), अंकित कुशवाह (जय दुर्गा विद्यालय). 17 वर्षे वयोगट मुले- धीरज कोळी (भाऊसाहेब राऊत विद्यालय), हर्षल सोनवणे (भाऊसाहेब राऊत विद्यालय), रवींद्र राठोड (जय दुर्गा विद्यालय), ओम जाधव (खुबचंद सागरमल विद्यालय). 19 वर्षे वयोगट मुले- शाहबाज खान पठाण (खुबचंद सागरमल विद्यालय), अजय वैराळकर (जय दुर्गा विद्यालय), प्रथम बाविस्कर (भाऊसाहेब राऊत विद्यालय), गणेश राजपूत (भाऊसाहेब राऊत विद्यालय). पंच म्हणून नरेंद्र भोई, विजय विसपुते, पूजा पाटील, देवानंद पाटील यांनी काम पाहिले, तर यशस्वितेसाठी सागर हिवराळे, प्रतीक तायडे, मनोज कोळी, पारस बाविस्कर, नीलेश ठाकरे, पवन कांडेलकर, भोजराज पवार यांचे सहकार्य लाभले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!