Type to search

क्रीडा जळगाव

जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा

Share

जळगाव | मू.जे. महाविद्यालय संचलित एकलव्य शूटिंग ऍकेडमी आयोजित जिल्हास्तर रायफल शुटींग स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेस चोपडा, भुसावळ, धरणगाव येथील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक मनोहर जाधव, प्राचार्य संदीप साठे उपस्थित होते.

दीक्षांत जाधव, कुंजली जाधव यांनी रेंज अधिकारी म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे प्रायोजक डॉ.गौरव पाटील हे होते. स्पर्धेत वेदांत पवार, तन्मय नंदनवार, शिवम पाटील, आशिष पाटल, प्रथमेश पाटील, प्रियदर्शनी पाटील, साहिबा सोमवंशी, विनीत पाटील, अर्थर्व कुलकर्णी, प्रथमेश मनोरे, हर्षदा बिर्‍हाडे, लिना पाटील, ईशा हतागळे, असलेशा साळुंखे, विनित पाटील या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यशस्वी खेळाडूंना रोख रक्कम, प्रमाणपत्र, मेडल्स, सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धा मू.जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर यांचे मार्गदर्शनाखाली प्रा.रणजीत पाटील, प्रा.सचिन महाजन, राजेंद्र नारखेडे, धर्मेश चर्तुर्वेदी, अखिलेश यादव, कोमल पाटील, गोपाल घुगे, वसंत सोनवणे, शंकर ठाकूर, सुभाष पाटील, यांनी काम पाहि ले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!