जिल्हास्तरीय कुस्ती जिंकणार्‍या कल्पेश विसावेचे कौतुक

0
धरणगाव । चाळीसगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत येथील सारजाई कुडे-बालकवी विद्यालयाचा विद्यार्थी कल्पेश भानुदास विसावे याने 14 वर्षाच्या आतील 38 किलो वजन गटात जिल्ह्यातील स्पर्धक मल्लांना चित करुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

या स्पर्धांचे पंच म्हणून अजय देशमुख, सुनिल देशमुख(चाळिसगाव) यांनी काम पाहिले. कल्पेशला क्रीडा शिक्षक एस.एल.सुर्यवंशी, डी.एन.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

कल्पेश हा धरणगाव तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा प्रसिध्द मल्ल भानुदास विसावे व नगरसेविका सौ.अंजली विसावे यांचा सुपुत्र आहे. कल्पेशच्या यशाबद्दल शिवसेना जिल्हाप्रमूख गुलाबराव वाघ, प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी यांनी सत्कार करुन त्याचे कौतुक केले. याप्रसंगी भानुदास विसावे, विजय महाजन, मोहन महाजन, कमलेश बोरसे, विलास पवार, जितेंद्र धनगर, अक्रम शेख, विनोद रोकडे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*