Type to search

नंदुरबार

जिल्हाधिकारी कार्यालयावर अंनिसचे आज धरणे आंदोलन

Share

आमलाड । वार्ताहर डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 6 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस चळवळीचे संस्थापक पद्मश्री डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनातील अक्षम्य दिरंगाई व तपास यंत्रणानी मुख्य सुत्रधारापर्यंत पोहचण्याच्या मागणीसाठी अंनिसच्या नंदूरबार जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने उद्या दि.20 रोजी सकाळी 11 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

धरणे आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.या आंदोलनात जिह्यातील महाराष्ट्र अंनिसच्या सर्व शाखांचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रधान सचिव व शाखांचे कार्यकर्ते तसेच पुरोगामी व परिवर्तनवादी समविचारी संस्था, संघटनांचे कार्यकर्ते यांनी संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र पाटील व प्रधान सचिव किर्तीवर्धन तायडे यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!